MB NEWS-युवा पत्रकार शुभम खाडे यांना प्रतिष्ठेचा कै. त्र्यंबक आसरडोहकर पुरस्कार जाहीर

 युवा पत्रकार शुभम खाडे यांना प्रतिष्ठेचा कै. त्र्यंबक आसरडोहकर पुरस्कार जाहीर

आंबाजोगाई — बीड जिल्ह्यातील मानाचा समजला जाणारा कै त्र्यंबक आसरडोहकर प्रतिष्ठानचा पत्रकारिता पुरस्कार यंदा ” दैनिक कार्यारंभ” चे उपसंपादक शुभम खाडे यांना जाहीर करण्यात आला आहे.
शुभम खाडे हे युवा पत्रकार असून ते होळ ता केज या ग्रामीण भागातून आले आहेत. कमी वयात त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात मोठा नावलौकिक संपादन केला आहे. गेल्या दहा वर्षांपासून कै त्र्यंबक आसरडोहकर प्रतिष्ठानच्या वतीने उत्कृष्ट पत्रकारिता हा मानाचा पुरस्कार दिला जातो. कोवीड काळानंतर हे सातत्य ठेवत या वर्षाचा पुरस्कार शुभम खाडे यांना जाहीर केला. प्रतिष्ठानच्या बैठकीत सर्वानुमते हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. असे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा किरण आसरडोहकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. डिसेंबर महिन्यात एका विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.या पुर्वी सय्यद दाऊद आडस, अभिजित गाठाळ अंबाजोगाई, दत्ता देशमुख विडा,अतुल कुलकर्णी बीडगोविंद शेळके घाटनांदूरकलीम अजीम पुणेश्रावण कुमार जाधव केजसंदिप सोनवलकर मुंबई आणि विद्या गावंडे औरंगाबाद, यांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !