MB NEWS-महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंतर्गत निवड

 महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंतर्गत विजय हजारे ट्रॉफीच्या संभाव्य संघात परळीच्या भूषण नावंदेची निवड 



परळी/प्रतिनिधी

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंतर्गत विजय हजारे ट्रॉफीच्या संभाव्य संघात परळी तालुक्यातील मौजे परचुंडी येथील प्रसिद्ध युवा क्रिकेटपटू भूषण नावंदे याची निवड झाली आहे. त्याच्या या निवडीबद्दल सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहे.

शंभूलिंग शिवाचार्य महाराज अंबाजोगाईकर यांच्याकडून शुभेच्छा

पुणे येथील आंतरराष्ट्रीय एमसीए क्रिकेट स्टेडियम गहुंजे, येथे विजय हजारे ट्रॉफी याचे सराव शिबिर चालू आहेत. या शिबिरामध्ये भूषण नावंदे याची निवड झालेली आहे. या सामन्यांमधून विजय हजारे ट्रॉफीसाठी मुख्य संघ निवडला जाणार आहे. नुत्याच झालेल्या सय्यद मुस्ताक अली ट्रॉफीसाठी सुद्धा संभाव्य संघात भुषण ची निवड झाली होती. भूषण हा औरंगाबाद मधील उदयनमुख खेळाडू आहे तसेच औरंगाबाद येथील व्हिजन क्रिकेट अकॅडमी चा खेळाडू आहे तो परचुंडी ता परळी जि बीड येथील मूळ रहिवाशी असून प्रसिद्द प्रेस फोटोग्राफर भीमाशंकर नावंदे यांचा मुलगा असून त्याच्या निवडीबद्दल आज परचुंडी येथे त्याचे अभिनंदन करण्यात आले व वडील भीमाशंकर नावंदे यांना ष.ब्र.108 शंभूलिंग शिवाचार्य महाराज अंबाजोगाईकर यांनी भूषणच्या पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद दिले यावेळी आदर्श शिक्षक अशोक नावंदे,उपसरपंच वैजनाथ पत्रावळे, माणिक आप्पा नावंदे ,लक्षमण आप्पा नावंदे वसंत आप्पा नावंदे,जनार्धन नावंदे, देवराव पत्रावळे,सुभाष नावंदे,गुरुलिंग नावंदे , हनुमंतआप्पा नावंदे सचिन रुपनर ,सुभाषदादा रुपनर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !