MB NEWS-मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरुन बीड जिल्ह्यातील युवकाने मारली उडी

 मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरुन बीड जिल्ह्यातील युवकाने मारली उडी








मुंबई - मंत्रालयात एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मंत्रालयात  मंत्रिमंडळाची बैठक सुरु असतानाच तरुणाने सहाव्या मजल्यावरुन उडी  मारली. पण सुदैवाने तरुण मंत्रालयात लावण्यात आलेल्या जाळीमध्ये अडकला आणि जीव वाचला. मंत्रालयात याआधीही अनेकदा आत्महत्येचे  प्रयत्न झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ही संरक्षक जाळी बसवण्यात आली होती.


      मिळालेल्या माहितीनुसार,  हा तरुण बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आहे. बापू नारायण मोकाशी असं या तरुणाचं नाव आहे. आज दुपारच्या सुमारास त्याने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षततेसाठी लावण्यात आलेल्या जाळीत तो अडकला  आणि जीव वाचला. यानंतर पोलिसांना त्याला ताब्यात घेतलं असून उपचारासाठी रुग्णालयात पाठवलं आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !