MB NEWS-नगर परिषदेने मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर दिशादर्शक फलक लावण्याची गरज
वैद्यनाथ दर्शनाला येणाऱ्या बाहेरगावच्या भाविकांना बसतोय 'चकवा'
![]() |
सोमवारी रात्री यात्रेकरूंची एक ट्रॅव्हल्स गणेशपार रोडवर आल्याने धांदल उडाली.अरुंद रस्त्यावरून वाट काढत ही गाडी मंदिराकडे रवाना झाली. ---------------------------------------------------------- |
नगर परिषदेने मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर दिशादर्शक फलक लावण्याची गरज
परळी वैजनाथ - देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी येथे प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी दररोज देशभरातून भाविक येत असतात. परंतु शहरात प्रवेश केल्यावर वैद्यनाथ मंदिर नेमके कोणत्या दिशेला आहे याचा याची माहिती नसल्याने अनेक वाहने थेट गाव भागात वाट चुकत आहेत,परिणामी त्यांना अरुंद रस्त्यावरून मार्ग काढत वैजनाथ मंदिर गाठावे लागत आहे. सोमवारी रात्री यात्रेकरूंची एक ट्रॅव्हल्स गणेशपार रोडवर आल्याने धांदल उडाली.कशीबशी ही गाडी मंदिराकडे रवाना झाली.
नगर परिषदेने शहराच्या विविध भागात मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिशादर्शक फलक लावणे गरजेचे झालेले आहे. मुख्यतः शहरात असलेल्या मौलाना अब्दुल कलाम चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि उड्डाणपूल परिसरात दिशादर्शक फलक नसल्याने यात्रेकरू भाविक मंदिराकडे जाण्याचा मार्ग चुकत आहेत. दरम्यान काही ठिकाणी संस्थांकडून फलक लावलेले आहेत. नगरपालिकेने वैद्यनाथ मंदिर मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर तात्काळ दिशादर्शक फलक लावणे गरजेचे झाले आहे.
- मुख्य रस्त्यावरचे अतिक्रमणही ठरत आहे भाविकांना अडचण -
शहरात प्रवेश केल्यावर बीड गंगाखेड अंबाजोगाई रस्त्यावरून येणाऱ्या भाविकांना विनाकारण उभे असणाऱ्या वाहनांचा सामना करावा लागतो. या अतिक्रमणामुळे भाविकांना मंदिराची वाट एक प्रकारे कठीणच होऊन बसते. उड्डाणपूल परिसर, राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक, नेहरू चौक (तळ परिसर) या भागात होणाऱ्या अनाधिकृत वाहनांच्या पार्किंगमुळे वैद्यनाथाच्या दर्शनाला येणारे भाविक बेजार होतात.या अतिक्रमणाकडे वाहतूक पोलीस आणि नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा