नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिली माहिती..

इमेज
नीट परीक्षा 2026 साठीची नवीन अपडेट: 21 जूनला होणार परीक्षा नीट परीक्षा 2026 साठीची नवीन अपडेट राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने जाहीर केली आहे.या अपडेट नुसार आता नीट परीक्षा 21 जून रविवार रोजी घेण्यात येणार आहे. या संदर्भातील माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आपल्या अधिकृत एक्स हॅण्डल वर दिली आहे. नीट परीक्षा 2026 तीन मे रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेपूर्वीच अनेक विद्यार्थ्यांच्या हाती या परीक्षेची प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर ही प्रश्नपत्रिका फुटली असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले. त्यानुसार राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने ही परीक्षा रद्द केले असल्याची घोषणा केली. देशातील 23 लाख हून अधिक विद्यार्थ्यांनी नीट 2026 ची परीक्षा दिली होती. आता अचानक ही परीक्षा रद्द झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याचा मनस्ताप झाला. या परीक्षे संदर्भातील तपास नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सीबीआय कडे दिला. सीबीआयच्या तपासामध्ये राजस्थान मधील सिकर जिल्ह्यात त्याचबरोबर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, लातूर अणि पुणे या ठिकाणाहून या परीक्षेची संबंधित संशयितांना सीबीआयने अटक केली. त्यानंतर आज नॅशनल टीसी टेस्टिंग एजन्सीने 21 जून...

MB NEWS-सुनिल चिकाटे यांना मातृशोक: पारुबाई श्रीरंगराव चिकाटे यांचे दुःखद निधन

 सुनिल चिकाटे यांना मातृशोक : पारुबाई श्रीरंगराव चिकाटे यांचे दुःखद निधन



परळी, प्रतिनिधी

संत ज्ञानेश्वर पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन,सामाजिक कार्यकर्ते सुनिल श्रीरंगराव चिकाटे यांच्या मातोश्री पारुबाई श्रीरंगराव चिकाटे यांचे अल्पाशा आजाराने औरंगाबाद येथील एका रुग्णालयात उपचार घेत असतांना मंगळवार दि.8 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास प्राणजोत माळवली आहे.

भिमवाडी येथील माय म्हणुन सर्वञ परिचित असलेल्या धार्मीक कार्यात नेहमी सहभागी असणाऱ्या मातोश्री पारुबाई श्रीरंगराव चिकाटे यांच्यावर औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार चालु होते.त्यातच त्यांची प्राणजोत माळवली मातोश्री पारुबाई चिकाटे यांच्या जाण्याने परिसरात दुःख व्यक्त होत आहे.


मातोश्री पारुबाई चिकाटे यांच्या पश्चात दोन मुल,तीन मुली,सुना,नातवंड असा मोठा परिवार आहे.


 *अत्यंविधी बुधवारी सकाळी 9 वाजता


दिवंगत मातोश्री पारुबाई चिकाटे यांच्या पार्थिवदेहावर बुधवार दि.9 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता भिमनगर येथील शांतीवन स्मशानभुमी येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या