युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सत्कार

 नाथ शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या  शिक्षणा सोबतच क्रीडा व कलेला प्राधान्य देते - प्रदीप खाडे

 यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सत्कार 

 परळी प्रतिनिधी

 नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नाथ शिक्षण संस्था ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या सोबतच विद्यार्थ्यांमध्ये असलेला क्रीडा आणि कलागुणांना प्राधान्य देऊन त्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने कार्य करत आहे असे मनोगत यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय येथील क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कारा प्रसंगी नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे यांनी व्यक्त केले.



  क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड व गटशिक्षणाधिकारी कार्यालय परळी वैजनाथ त्यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित क्रीडा स्पर्धेमध्ये नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्हा मल्लखांब स्पर्धेत व तालुका क्रिकेट स्पर्धेत विजय संपादन केल्याबद्दल यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात नाथ शिक्षा संस्थेच्या सहसचिव प्रदीप खाडे, उद्योजक सुरेश नाना फड, प्राचार्य प्रा.अतुल दुबे यांच्या हस्ते  या विजयी  विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.



जिल्हा मल्लखांब स्पर्धेत यश मिळवून विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेले चि.आर्यन फड, चि. प्रथमेश दुबे यांचा तर तालुका क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्वप्रथम येऊन जिल्ह्यासाठी निवड झालेल्या संघातील विद्यार्थी शेख रेहान,ओमकार चाटे,शेख आयान,मनोज फड,हनुमंत मुंडे,सोमनाथ मुंडे,महादेव भाकरे,शेख समीर,अर्शद पठाण,यश हंगे,किरण मुंडे,शिवाजी गीत्ते,सोमनाथ रेवले या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.यु.एन.फड, प्रास्ताविक प्रा.एस.आर. कापसे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.किरण शिंदे यांनी केले या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या