MB NEWS- देवाच्या दारातच चोरी:दानपेट्या फोडून रक्कम पळवली
परळीतील नर्मदा प्रसाद हनुमान मंदिरात दानपेट्यांवर चोरट्यांचा डल्ला
परळी वैजनाथ ,प्रतिनिधी...
परळी शहरातील बस स्थानक परिसरात कावेरी प्लाझा जवळ असलेल्या नर्मदा प्रसाद हनुमान मंदिरातील दोन दान पेट्या फोडून त्यातील रोख रक्कम पळविल्याची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी चक्क देवाच्या दारातच चोरी केल्याने खळबळ माजली असून या चोरट्यांचा शोध घेऊन कारवाई करावी अशी भावीकांतून मागणी होत आहे.
परळीतील बस स्थानक ते घरणीकर रोड या रस्त्यावर जुने हनुमान मंदिर आहे. या मंदिरात नेहमीच भटकंती करणारे साधू थांबलेले असतात. या मंदिरातील देवतांच्या दर्शनासाठी नित्यनेमाने भाविक मोठ्या संख्येने जातात. या मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात इसमाने दोन दानपेट्यांचे कुलूप तोडून टाकले व आतील भाविकांनी दान केलेली रक्कम पळवली आहे. याबाबत नर्मदा प्रसाद हनुमान मंदिराच्या विश्वस्तांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे्. अधिक तपास परळी पोलीस करत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा