MB NEWS- ● लक्षवेधी: छत्रपती संभाजी महाराज यांनी फोटो शेअर करत कौतुक केलेला परळीचा मूकबधिर युवक सचिन भारती नेमका कोण आहे?

 छत्रपती संभाजी महाराज यांनी फोटो शेअर करत कौतुक केलेला परळीचा मूकबधिर युवक सचिन भारती नेमका कोण आहे?

रळी वैजनाथ, प्रतिनिधी.....
          परळी ही रत्नांची खाण आहे. विविध क्षेत्रात, विविध ठिकाणी ,जिथे जातील तिथे परळीकर असणारा माणूस कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपला ठसा उमटवतो म्हणजे उमटवतोच. त्यातही राजकीय वातावरणात पटकन संदर्भ देत आपली ओळख निर्माण करण्याची एक नैसर्गिक क्षमताच जणू परळीकरांमध्ये आहे. याचे वेगवेगळ्यावेळी कायमच उदाहरण बघायला मिळते. मग क्षेत्र कोणतेही असो परळीकर म्हटलं की तो प्रभावी ठरणारच. अशाच प्रकारचा एक किस्सा सध्या चर्चेत आला आहे. तो म्हणजे कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांनी एका मूकबधिर युवकाचे स्वतःसोबत छायाचित्र सामाजिक माध्यमात शेअर करत या युवकाचे कौतुक केले आहे. आणि विशेष म्हणजे त्यांनी हा युवक परळीचा असल्याचा उल्लेख केल्याने अचानक सचिन भारती हे नाव वलयांकित झाले आहे. सचिन भारती हा परळीचा युवक नेमका कोण? त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.


         सचिन भारती हा परळीचा एक हरहुन्नरी चुणचुणीत व प्रतिभावंत युवक आहे. सचिन भारती हा युवक मूकबधिर असला तरी कम्प्युटरच्या क्षेत्रात तो मास्टरमाइंड आहे. त्याने आपल्या शारीरिक व्यंगावर मात करत उच्च शिक्षण घेत स्वकर्तृत्वातून जिद्दीने स्वतःचे आयुष्य घडवलेले आहे. पॉलिटेक्निक चे शिक्षण घेतलेला सचिन भारती सध्या दिल्ली एअरलाइन्स मध्ये नोकरीला आहे. म्हैसूर येथे त्याने जे एस एस पॉलिटेक्निक मध्ये आपले शिक्षण पूर्ण केलेले आहे. परळीत त्याचा मित्रपरिवारही मोठा आहे. दरम्यान सचिन भारती ने आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही दिवस आपल्या परळी येथील दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी स्थापन केलेल्या नागनाथअप्पा हालगे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कॉम्प्युटर लॅब असिस्टंट म्हणूनही नोकरी केलेली आहे.


      सचिन भारतीचे जीवन हे अतिशय संघर्षमय असून सर्वांनाच ते एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरावे अशीच त्याची जीवन कहाणी आहे. काही वर्षांपासून सचिन भारतीचे कुटुंब हे  टोकवाडी येथील वेअर हाऊस च्या समोरील परिसरात राहायला आलेले आहे. भारत भारती हे सचिनचे वडील टोकवाडी येथे  काम करत. काही वर्षांपुर्वी  वडीलांचे निधन झालेले आहे.मुळ पाथरी तालुक्यातील असलेले हे कुटुंब अनेक वर्षांपुर्वी कामानिमित्त येथे आले व इथेच स्थिरस्थावर झाले. सचिनला आई, दोन भाऊ व एक बहिण आहे.   निसर्गतः मूकबधिर असलेला सचिन मात्र अतिशय प्रतिभावान व लहानपणापासूनच क्रियाशील होता. विशेष शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. आपल्या शारीरिक कमतरतेचा कधीही संकोच न बाळगता इतर मुलांप्रमाणेच त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण जिद्दीने पूर्ण केले. काही दिवस त्याने मैसूर येथे नोकरी केली. त्यानंतर तो काही दिवस परळीत आला. परळीच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जवळपास एक ते दीड वर्षाचा काळ त्याने कम्प्युटर लॅब असिस्टंट म्हणून काम केलेले आहे. त्यानंतर त्याला दिल्ली येथे नोकरी लागली.


       आपल्या शारीरिक कमतरतेवर मात करत त्याने जिद्दीने आपले शिक्षणही पूर्ण केले आणि आपले आयुष्य स्थिरस्थावर केले व कुटुंबालाही स्थिर केले. नोकरीच्या निमित्ताने तो सध्या दिल्ली येथे राहतो. सचिनच्या या जीवन कहाणीने नक्कीच अनेकांना प्रेरणा मिळणार आहे. छत्रपती संभाजी राजे यांनी त्याचे भरभरून कौतुक करणारी पोस्ट समाज माध्यमात शेअर केली आहे. त्यामुळे परळीचा हा कर्तुत्ववान युवक चर्चेत आला आहे. नक्कीच तो परळीचे एक भूषण असून सर्वांनाच एक प्रेरक व्यक्तिमत्व आहे यात शंका नाही.


अशी आहे छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेली पोस्ट.....

       आज दिल्लीहून छत्रपती संभाजीनगरला येत असताना दिल्ली विमानतळावर अचानक एक युनिफॉर्म मधील मुलगा माझ्याकडे पळत आला. जवळ येताच हातवारे करत इशाऱ्यानेच त्यांनी मला ओळखत असल्याचे सांगितले. माझ्या लक्षात आले की हा मुलगा मूकबधिर आहे. नंतर त्यांनी मोबाईल काढून 'सचिन भारती' असे आपले नाव लिहून दाखवले. ते बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथचे असून एअरलाईन मध्ये नोकरीच्या निमित्ताने दिल्लीत राहतात. तसेच पुढे त्यांनी "शिवाजी महाराज संभाजी महाराज" असेही लिहीले.

आपल्या नैसर्गिक कमीवर मात करून दिल्लीसारख्या शहरात हा तरूण स्वत:च्या पायावर आत्मविश्वासाने उभा आहे. अशी माणसं आपल्याला लढण्याची प्रेरणा देत असतात. बोलता जरी येत नसले तरी मला भेटून त्याच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह दिसत होता. हे पाहून माझेही मन सुखावले...

Today I’m travelling to Chhatrapati Sambhajinagar from the Delhi Airport, where I was surprised by a uniformed gentleman running towards me. On coming near he made gestures from which I understood that he’s differently abled, who can’t speak or hear. But using his mobile phone he communicated that his name is “Sachin Bharati”; that he’s from Beed-Parali and working in a leading Airlines. He proceeded to write “Shivaji Maharaj and Sambhaji Maharaj”. 

Overcoming his natural disabilities, and working in a challenging and competitive environment like New Delhi in such a confident manner is inspiring. He’s a true fighter and even though he can neither speak nor hear, he was able to communicate the joy of meeting me in such a genuine manner. Such champions of life leave a lasting impression on me…


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !