MB NEWS-श्री संत मन्मथस्वामी भक्त कपिलधारहून परळीच्या प्रभू वैद्यनाथाकडे

 श्री संत मन्मथस्वामी भक्त कपिलधारहून परळीच्या प्रभू वैद्यनाथाकडे



वीरशैव लिंगायत समाज, श्री मन्मथस्वामी सेवा संघ व महादेव इटके यांच्या वतीने प्रसादाचे वितरण


परळी वैजनाथ/ प्रतिनिधी


श्री क्षेत्र कपिलधार येथील श्री संत मन्मथस्वामींच्या पवित्र समाधीचे दर्शन घेवून आपआपल्या गावी परतणाऱ्या वीरशैव लिंगायत बांधवांची पाऊले आता परळीतील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले श्री क्षेत्र वैद्यनाथ प्रभूंच्या दर्शनासाठी वळत असून परळीत यावे श्रीं चे दर्शन घ्यावे असे समिकरणच आता रूढ झाले आहे. एकीकडे भाविकांची गर्दी वाढत असतांना त्यांना आपल्याला घडेल त्या श्रद्धेतून त्यांच्यासाठी खिचडी, चहा, पाणी व अन्य अन्न पदार्थाचा महाप्रसादही परळीतील वीरशैव लिंगायत समाजाच्या श्री मन्मथ स्वामी सेवा संघाचे सर्व पदाधिकारी, महाराष्ट्र वीरशैव सभेचे तालुकाध्यक्ष महादेव इटके व पदाधिकारी व सदस्य गेल्या अनेक वर्षापासून करीत आहेत.


श्रीक्षेत्र कपिलधारहुन दर्शन घेऊन परत येणाऱ्या भाविकांसाठी मंगळवार दिनांक 8  नोव्हेंबर रोजी सकाळी  5  वाजल्यापासून येथील श्री संत गुरुलिंग स्वामी मठ संस्थान बेलवाडीमध्ये येथे वीरशैव लिंगायत समाजाच्या श्री मन्मथ स्वामी सेवा संघाच्या वतीने खिचडी प्रसादाचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी ठेवण्यात आला होता तर महाराष्ट्र वीरशैव सभेचे तालुकाध्यक्ष महादेव इटके यांच्या वतीने चहा व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती आज मंगळवारी रात्री उशिरापर्यंत हजारो भाविक भक्तांनी  लाभ घेतला. श्री मन्मथ स्वामींची यात्रा संपली असून यात्रेत सहभागी झालेल्या भाविकांची पाऊले आता आपआपल्या घराकडे वळत असतांना श्री क्षेत्र परळी येथे वैद्यनाथ प्रभूंच्या दर्शनाकडेही वळाली आहेत.आज दिवसभर भाविक मोठ्या संख्येने परळीत दाखल झाले आहेत. मागील अनेक वर्षापासून ही परंपरा परळीमध्ये श्री मन्मथ स्वामी सेवा संघ, महाराष्ट्र वीरशैव सभेचे तालुका अध्यक्ष महादेव इटके हे  जपत आहेत. 

Click:- ■ *WATCH : कपीलधार परतवारीच्या यात्रेकरुंमुळे वैद्यनाथ मंदिर परिक्षेत्र गजबजले | यात्रेचे स्वरुप.* _#mbnews #subscribe #like #share #comments_


बेलवाडी परिसराला आले जत्रेचे स्वरूप

श्रीक्षेत्र कपिलधार येथील श्री संत मन्मथ स्वामी यांच्या पवित्र समाधी स्थळाचे दर्शन घेऊन आंध्रप्रदेश कर्नाटक तामिळनाडू व महाराष्ट्रातील विविध भागातून आलेले हजारो भाविक भक्तांनी आज मंगळवारी परळी येथील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले प्रभुवैद्यनाथाचे दर्शन घेतले. पळीत आलेल्या भाविकांची महाप्रसाद व चहा पाण्याची व्यवस्था वीरशैव लिंगायत समाज, श्री मन्मथ स्वामी सेवा संघ महाराष्ट्र वीरशैव सभा व महादेव इटके यांच्या वतीने करण्यात आली होती. महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी हजारो भावीक भक्तांनी गर्दी केल्याचे दिसून आले दरम्यान बेलवाडी परिसरात बेल फुल नारळ आदी प्रसादालयाची दुकाने मोठ्या संख्येने घातली गेली होती त्यामुळे वैजनाथ मंदिर परिसराला जणू काही जत्रेचे स्वरूप आल्याचे दिसून आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री संत श्री संत मन्मथ स्वामी सेवा संघाचे  शिवराज आप्पा बोटूळे, लक्ष्मण आप्पा बुद्रे, रामकिशन साखरे,वैजनाथ आप्पा गोपनपाळे, बालाजी सेलूकर, संदीप हालगे, गुरूलिंग स्वामी, अजय स्वामी, महाराष्ट्र वीरशैव सभेचे तालुकाध्यक्ष महादेव ईटके, संजय खाकरे , शिवकुमार केदारी, विकास हालगे, अश्विन भैया मोगरकर, सुशिल हरंगुळे, संतोष जुजगर, सोमेश्वर लिंगाडे, दिपक ईटके तसेच श्री स्वामी समर्थ महिला भजनी मंडळाच्या श्रीदेवी हालगे, महानंदा हालगे, शामला हरंगुळे, सुवर्णा मोगरकर,निर्मला पोपडे,छाया कोडी, सत्यभामा पत्रवाळे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !