MB NEWS-प्रा.दासू वाघमारे यांची रिपाईच्या मराठवाडा विभागीय सचिव पदी निवड

 प्रा.दासू वाघमारे यांची रिपाईच्या मराठवाडा विभागीय सचिव पदी निवड




परळी / प्रतिनिधी 


    फुले शाहू आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रा. दासू वाघमारे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठवाडा विभागाच्या विभागीय सचिव पदी नुकतीच निवड करण्यात आली. रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष  नामदार केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथे संपन्न झालेल्या बैठकीत ही नियुक्ती करण्यात आली.

      नुकतेच औरंगाबाद येथील सुभेदारी रेस्ट हाऊस येथे रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय समाज कल्याण मंत्री नामदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपाईची राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते तथा मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीमध्ये खासदार रामदास आठवले यांच्या सोबत काम करणारे प्राध्यापक दासू वाघमारे यांची मराठवाडा विभागाच्या सचिव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली.

    या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे होते. तर याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून कार्याध्यक्ष बाबुराव कदम, प्राध्यापक गौतम सोनवणे, सरचिटणीस भास्कर नाना रोडे प्रदेश सचिव चंद्रकांत चिकटे, प्रदेश सचिव धम्मानंद चव्हाण प्रदेश संघटक उपस्थित होते. याबरोबर याच बैठकीत मराठवाडा विभागाच्या अध्यक्षपदी औरंगाबाद येथील मिलिंद शेळके सरचिटणीस पदी देविदास कांबळे लातूर यांचीही निवड करण्यात आली आहे.

    मराठवाडा विभागाच्या सचिव पदी निवड झाल्यानंतर प्राध्यापक दास वाघमारे म्हणाले की केंद्रीय समाज कल्याण मंत्री नामदार रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा मराठवाड्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जाळे निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या निवडीनंतर प्रा. दासू वाघमारे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार