MB NEWS-डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर तपोनुष्ठान समिती व वीरशैव समाज परळीची मागणी

 भक्तीस्थळाबाबत अफवा पसरविणार्‍याविरूद्ध कारवाई करा



डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर तपोनुष्ठान समिती व वीरशैव समाज परळीची मागणी


परळी/प्रतिनिधी

अहमदपुर जि.लातूर येथे वसुंधरारत्न डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांची संजीवन समाधी असून त्याजागेस भक्तीस्थळ म्हणून जाहीर करण्यात आले आहे.परंतू बांधकामास काही मंडळी अडथळा निर्माण करीत असून अस्थी चोरल्याची अफवा समाजात पसरवित आहेत. अस्थी चोरण्याचा कोणताही प्रकार येथे घडलेला नसून समाजात तेढ निर्माण करू पाहणार्‍या व्यक्तींवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रसंत वसुंधरारत्न डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर तपोनुष्ठान समिती परळी तसेच वीरशैव समाज बांधव व भक्तांनी केली आहे.


राष्ट्रसंत वसुंधरारत्न  डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या संजीवन समाधीचे बांधकाम चालू असून या भक्ती स्थळाचे भुमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या हस्ते 10 सप्टेंबर रोजी करण्यात आले. वसुंधरारत्न डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज बंद पेटीत संजीवन समाधीत शिवैक्य असतांना तसेच समाधी बांधकाम त्यांनी सूचविल्याप्रमाणे सर्व भक्तजणांच्या मार्फत सुरू आहे.काही लोक खोडसाळपणाने महाराजांच्या अस्थी चोरल्याचा अफवा पसरवून समाजात तेढ व शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत आहेत.अशा सर्व व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी तसेच समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी व सामाजिक एैक्यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणार्‍या राष्ट्रसंत वसुंधरारत्न डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या संजीवन समाधीचे बांधकाम एकजुटीने पूर्ण करावे असे आवाहन केले जात आहे. 


या निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,तसेच जिल्हाधिकारी बीड, उपविभागीय अधिकारी परळी, तहसीलदार परळी यांना देण्यात आल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !