MB NEWS-वीरशैव समाज बांधवांच्या वतीने स्वागत

 नागापूर-कपिलधार पायी दिंडीचे परचुंडी येथे वीरशैव समाज बांधवांच्या वतीने स्वागत



परळी/प्रतिनिधी

नागापूर ते कपिलधार पदयात्रा वर्ष 47 वे असून या पदयात्रेचे आज दुपारी 2 वाजता परचुंडी येथे आगमन झाले असता  यावेळी ष.ब्र.108 श्रीगुरु शंभूलिंग शिवाचार्य महाराज अंबाजोगाईकर यांचे व पदयात्रेचे भव्य स्वागत परचुंडी येथे वीरशैव समाजाच्या वतीने करण्यात आले.

श्रीक्षेत्र मन्मथस्वामी कपीलधारकडे आज बुधवार दि.2 नोव्हेंबर रोजी नागापुर ते कपीलधार पदयात्रा दिंडीचे परळी तालुक्यातील मौजे परचुंडी येथे आगमन झाले. यावेळी वीरशैव समाज बांधवांच्या वतीने पायी दिंडीचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. यावेळी प्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. तसेच पुणे येथील आंतरराष्ट्रीय एमसीए क्रिकेट स्टेडियम गहूनजे येथे विजय हजारे ट्रॉफी याचे सर्व शिबीर चालू आहे या शिबिरामध्ये भूषण नावंदे याची निवड झाली आहे असून त्याच्या या निवडीबद्दल आज  बुधवारी परचुंडी येथे त्याचे अभिनंदन करून सत्कार करण्यात आला व त्याचे वडील प्रसिद्ध पे्रस फोटोग्राफर भीमाशंकर नावंदे यांना ष.ब्र.108 शंभूलिंग शिवाचार्य महाराज अंबाजोगाईकर यांनी भूषण नावंदे याच्या पुढील वाटचालीसाठी व शिवकुमार पत्रावळे याला सीईटी परीक्षेत 564 गुण प्राप्त झाल्यामुळे त्यालाही श्रीगुरु यांनी आशीर्वाद दिले. यावेळी आदर्श शिक्षक अशोक नावंदे, उपसरपंच वैजनाथ पत्रावळे, माणिकअप्पा नावंदे ,लक्षमणअप्पा नावंदे, वसंतअप्पा नावंदे, जनार्धन नावंदे, देवराव पत्रावळे, सुभाष नावंदे, गुरुलिंग नावंदे , ओंकारेश्वर पत्रवाळे,  हनुमंतअप्पा नावंदे सचिन रुपनर ,सुभाषदादा रुपनर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार