MB NEWS- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा एका नव्या वादाच्या भोवऱ्यात

 पायात चपला घालून हुतात्म्यांना वाहिली श्रद्धांजली !

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा एका नव्या वादाच्या भोवऱ्यात

वादात राहिलेले महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आता पुन्हा एका नव्या वादात सापडले आहेत. आज 26/11 दहशतवादी हल्ल्या निमित्त मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना पायात चपला घालून त्यांनी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा नवीन वादाला तोंड फुटले आहे.

26/11 या दहशतवादी हल्ल्याला आज 14 वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने मुंबईत विविध ठिकाणी श्रद्धांजलीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने मुंबईत एका कार्यक्रमांमध्ये हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पायात चपला घालून श्रद्धांजली देताना दिसून आले.

विशेष म्हणजे या कार्यक्रमात त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री मंगल प्रभात लोढा तसेच मंत्री दीपक केसरकर हे सुद्धा उपस्थित होते. या सर्वांनी चपला काढून हुतात्म्याना श्रद्धांजली वाहिली. परंतु, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चपला घालून हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पित केली. यावरून आता पुन्हा एकदा राज्यपाल वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार