युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-संविधान दिन उत्साहात साजरा

 लक्ष्मीबाई देशमुख राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा




परळी वैजनाथ दि.२६ (प्रतिनिधी)

             येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने संविधान दिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमात २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात आली.



                 शहरातील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने संविधान दिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी (दि.२६) करण्यात आले. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, प्राचार्य डॉ लक्ष्मण मुंडे, प्रमुख वक्ते प्रा.डॉ. विनोद जगतकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आल्यानंतर संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. यावेळी कनिष्ट महाविद्यालयातील विद्यार्थिंनींनी बुध्दीबळ स्पर्धेत जिल्हास्तरावर यश संपादन केल्याबद्दल अरशिया कच्ची, मुस्कान शेख, प्रणिता देवधरे यांचा सत्कार  तसेच प्रशिक्षक श्री.तपके यांचा करण्यात आला. मुख्य मार्गदर्शक प्रा.डॉ. विनोद जगतकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, भारताचे संविधान जगात एकमेव आहे की, ज्या संविधानाची सुरुवात आम्ही लोक व शेवट जनतेलाच समर्पित करण्यात आले असल्याने प्रतिपादन केले. प्राचार्य मुंडे व विद्यार्थिनींनी यांनी मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय देशमुख यांनी केला. प्रास्ताविक प्रा.प्रविण फुटके, सुत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी प्रा. राजर्षी कल्याणकर, आभार प्रा.डॉ. रंजना शहाणे यांनी मानले तर कार्यक्रमास प्रा.डॉ.प्रविण दिग्रसकर, प्रा.राठोड यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात २६/११ च्या हल्ल्यात शहिद झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहण्यात आली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या