परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
16 डिसेंबर पासून पुण्यासाठी परळी मार्गे विशेष रेल्वे
परळी / प्रतिनिधी
अमरावती-पुणे-अमरावती ही विशेष रेल्वे सेवा 16 डिसेंबर पासून सुरू होणार असून ही विशेष रेल्वे परळी मार्गे धावणार असल्याने परळी येथून पुण्याला जाणाऱ्या व्यक्तींची सोय होणार आहे.
विशेष गाडी क्र 01439 पुणे-अमरावती ही 16 डिसेंबर पासून दर शुक्रवार व रविवार रोजी धावणार असून ही गाडी पुणे येथून सायंकाळी 10:50 ला अमरावती कडे रवाना होणार आहे.परळी येथे ही विशेष गाडी त्या पुढील दिवशी सकाळी 8 वाजता येऊन अमरावती येथे सायंकाळी 5:30 ला पोहचणार आहे.तर विशेष गाडी क्र01440 अमरावती-पुणे ही दर शनिवार व सोमवार रोजी पुणे कडे धावणार असून अमरावती येथील ही गाडी सायंकाळी 7:50 ला निघून पुढील दिवशी सकाळी 5:20 ला येऊन पुणे येथे सायंकाळी 4:20 ला पोहचणार आहे.
दोन्ही शहरातील तब्बल 822 किलोमीटर अंतर ही विशेष रेल्वे 18 तास 30 तासात पूर्ण करणार असून या गाडीस वातानुकूलित, शयनयान व जनरल असे 17 डब्बे असणार आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा