MB NEWS-मुंबई येथील आघाडीच्या 17 डिसेंबर रोजी आयोजित हल्लाबोल मोर्चात सामील व्हा-दीपक सिरसाट

 मुंबई येथील आघाडीच्या 17 डिसेंबर रोजी  आयोजित हल्लाबोल मोर्चात सामील व्हा-दीपक सिरसाट




*परळी वैजनाथ (प्रतिनिधी)*


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे नेते  हे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अशा महापुरुषाबद्दल अपमानजनक वक्तव्य करुन गरळ ओकत आहे. महाराष्ट्र व कर्नाटक सीमाप्रकरणाबाबत व मुंबई येथील धारावी झोपडपट्टी अदानी यांच्या घशात घालण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. या विषयाचा विरोधात महाविकास आघाडीच्यावतीने दिनांक 17 डिसेंबर रोजी हल्लाबोल आांदोलन मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्च्यात जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामील व्हावे असे आवाहन काँगे्रसचे नेते दीपक सिरसाट यांनी केले आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार दिनांक 17  डिसेंबर 2022 रोजी काढण्यात येणार आहे. महाविकास आघाडीचा मोर्चा सकाळी 11.30 वाजता जिजामाता उद्यान (राणीचा बाग) बायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई पर्यंत असणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील काँग्रेसपक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आवर्जुन सामील व्हावे. राज्याचे राज्यपाल भगत कोश्यारी व भाजपनेते सातत्याने महापुरुषाबद्दल अपमानजनक वक्तव्य करीत आहे. राज्यातील सांगली जिल्ह्यातील अनेक गावांना कर्नाटक राज्यात जाण्याबाबत सरकार उघडपणे भुमिका घेत आहे. हे दुर्दैवी असून दुसरीकडे धारावी झोपडपट्टी उध्दवस्त करुन ती जागा उद्योगपती मित्र आदानी यांच्या घश्यात घालत आहे. त्यामुळे परिसरात 10 लोक लोक विस्थापीत होणार असल्यामुळे महाविकास  सरकार विरुध्द हल्लाबोल आंदोलन मोर्चा काढत आहे. यामध्ये सामील होण्याचे आवाहन काँगे्रसचे नेते अनु .जाती.विभाग.परळी शहर अध्यक्ष दीपक सिरसाट यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार