MB NEWS:परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास पुरवणी मागण्यांमधून आणखी 20 कोटींची तरतूद

 परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास पुरवणी मागण्यांमधून आणखी 20 कोटींची तरतूद

परळी वैद्यनाथ कॉरिडॉरसाठी अधिवेशनात मागणी करणार -आ. धनंजय मुंडे 


परळी (दि. 20) - राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातून परळीकरांसाठी एक आनंदाची बातमी असून 133.58 कोटी रुपयांच्या परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या पुढील टप्प्यातील वीस कोटी रुपयांच्या खर्चास राज्य शासनाने पुरवणी मागण्यांमधून मान्यता दिली आहे. 

 यासाठी माजी मंत्री,  आमदार धनंजय मुंडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.


महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना धनंजय मुंडे यांनी नगर विकास विभागाचा माध्यमातून सुमारे 133.58 कोटी रुपयांच्या परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मान्यता प्राप्त करून दिली होती. यातून याआधीही एका भव्य भक्त निवासासह विविध कामे करण्यात येत आहेत.  आता आणखी 20 कोटी रुपये सध्या सुरू असलेल्या अधिवेशनाच्या पुरवणी मागण्या मधून मंजूर झाले आहेत.


परळी शहर हे प्रभु वैद्यनाथांच्या वास्तव्याने पावन झालेले बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे अतिशय क्षेत्र आहे या ठिकाणी महाशिवरात्री सह विविध निमित्ताने लाखो शिवभक्त देशभरातून परळी येथे दर्शनासाठी येतात . 


मात्र परळी वैद्यनाथ मंदिर परिसर तसेच शहरांमध्ये त्या दृष्टीने भाविकांसाठी पूरक सुविधा उपलब्ध नाहीत. याचा विचार करून राज्य शासनाने ज्या पद्धतीने नुकताच पंढरपूर कॉरिडॉर करण्याचा निर्णय घेतला व त्यास 300 कोटी रुपयांची निधी उपलब्ध करून दिला त्याच धर्तीवर परळीला देखील परळी वैद्यनाथ कॉरिडॉर मंजूर करून येथे 500 कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा अशी मागणी धनंजय मुंडे या अधिवेशनात करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी 20 कोटी रुपयांचा निधी पुरवणी मागण्यांमधून मंजूर केल्याबद्दल आमदार धनंजय मुंडे यांनी समस्त परळीकर यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार