MB NEWS-राज्यात 4,122 तलाठ्यांची भरती होणार

 राज्यात 4,122 तलाठ्यांची भरती होणार






पुणे, : महसूल विभागामार्फत राज्यातील तलाठी पदाच्या चार हजार 122 पदांची भरती लवकरच होणार आहे. त्यामध्ये रिक्त असलेल्या एक हजार 12 आणि नव्याने निर्माण करण्यात आलेल्या तीन हजार 110 या पदांचा समावेश आहे. त्याबाबतची कार्यवाही महसूल विभागाकडून सुरू करण्यात आली असून येत्या पंधरा दिवसांत जिल्हानिहाय माहिती पाठविण्याचे निर्देश राज्याचे कार्यासन अधिकारी श्रीकांत मोहिते यांनी विभागीय आयुक्तांना दिले आहेत.





महसूल विभागाअंतर्गत असलेल्या तलाठ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे सध्या तीन ते चार गावांसाठी एक तलाठी अशी
सद्य:स्थिती आहे. परिणामी गावातील कामांवर, लोकांना मिळणार्‍या सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. तलाठ्यांची रिक्त पदे भरण्याची मागणी राज्य तलाठी संघाच्यावतीने शासनाकडे अनेकदा करण्यात आली होती.

राज्यातील महसुली विभागातील नाशिक विभागात 1035, औरंगाबाद विभागात 847, कोकण विभागात 731, नागपूर विभागात 580, अमरावती विभागात 183 तर पुणे विभागात 746 अशा एकूण 4122 पदांची भरती लवकरच सुरू होणार आहे. त्याबाबतची कार्यवाही महसूल विभाकडून सुरू करण्यात आली असून प्रत्येक विभागीय आयुक्तांकडून जिल्हानिहाय तपशील सादर करण्यास शासनाने सूचित केले आहे. त्याचबरोबर मागासवर्गीय कक्षाकडून बिंदू नामावली प्रमाणित करुन त्यासंदर्भातील सामाजिक आरक्षण, समांतर आरक्षणाचा तपशीलही जिल्हानिहाय मागवण्यात आला आहे. त्यामुळे आता सुशिक्षित तरुणांना नोकरीची चांगली संधी मिळणार आहे.

       

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !