MB NEWS:भाजप नेते जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात, 50 फूटावरून कार नदीत कोसळली

 भाजप नेते जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात, 50 फूटावरून कार नदीत कोसळली



       




भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला फलटण येथे अपघात झाला. या अपघातात जयकुमार गोरे हे जखमी झालेले आहेत. अधिक उपचारासाठी त्यांना पुणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा फलटण लोणंद रस्त्यावर अपघात झाला. फलटण शहरानजीक स्मशानभूमीजवळ बाणगंगा नदीवरील पुलावरून गाडी ५० फूट खाली कोसळून हा अपघात झाला. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आमदार जयकुमार गोरे हे लोणंद कडून फलटणच्या दिशेने येत होते. यावेळी चालकाला पुलाचा अंदाज न आल्याने गाडी पुलावरून खाली कोसळली.

यामध्ये आमदार जयकुमार गोरेंसह त्यांचे स्वीय सहाय्यक, बॉडीगार्ड आणि चालक असे चौघेजण या अपघातात जखमी झाले आहेत. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना याबाबत आमदार जयकुमार गोरे यांनी जखमी अवस्थेत मोबाईल वरुन कळवताच पुढील चक्रे फिरुन जखमींना फलटण, बारामती आणि पुणे येथे दाखल करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार