परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-माणिकनगर येथे भागवत कथा सोहळ्याची उत्साहात सांगता

 संतसंगतीने जीवनाला मिळते आदर्श दिशा : हभप नारायण महाराज बारटक्के



माणिकनगर येथे भागवत कथा सोहळ्याची उत्साहात सांगता


*ह भ प उत्तम महाराज होळंबे यांचे काल्याचे किर्तन; सवाद्य मिरवणुकीने निघाली श्रींची दिंडी*


*परळी वैजनाथ/प्रतिनिधी*

समस्त प्राणिमात्रांचे कल्याण श्रीमद्भागवत कथेत सांगितले आहे . भागवत कथेतून सांगितलेल्या ज्ञानाचा आत्मसात केल्यास मनुष्याच्या जीवनात सुख , शांती व समृद्धी लाभणार आहे . तर संतसंगतीने जीवनाला वेगळीच दिशा मिळते , असे प्रतिपादन भागवताचार्य ह.भ.प.श्री नारायण महाराज बारटक्के यांनी केले . 

परळी वैजनाथ येथील माणिकनगर भागातील श्री महारुद्र संस्थान हनुमान मंदिर येथे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा सप्ताह उत्साहात व धार्मिक वातावरणात पार पडला . दरम्यान आज सकाळी श्रींची स्वाद्य मिरवणुकीने दिंडी काढण्यात आली. यात महिला पुरुष भावीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते . भागवत कथेची सांगता ह भ प उत्तम महाराज होळंबे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.  भागवत कथा सप्ताहाचे निरुपण भागवताचार्य ह.भ.प.श्री नारायण महाराज बारटक्के यांनी केले . यावेळी ते बोलत होते . 


सात दिवस चाललेल्या या कथा सप्ताहाला पंचक्रोशीतील भाविकांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला .  कथेसाठी त्यांना नामांकित मृदंग वादक ह . भ . प . बाळू महाराज वरवटकर, ह भ प उत्तम महाराज होळंबे यांनी आपल्या सुमधुर व ओजस्वी वाणीतून विविध भजने सादर केली. त्यांना ह भ प शेषराव महाराज वरवटकर माणिक महाराज धाकपाडे  आदींची संगत लाभली . पुढे भागवताचार्य ह.भ.प.श्री नारायण महाराज बारटक्के महाराज म्हणाले की , श्रीमद् भागवत कथा हे ग्रंथ नसून प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णची वाणी आहे . या कथेत भगवंतांचे २४ अवतार यांची कथा असून , विशेष श्रीकृष्ण भगवंताच्या बाल लीलांचे वर्णन करणारी व सर्वांना आनंद देणारी आहे . कथेतील प्रत्येक पात्र हे एक शिकवण देत असते . या कथेचे निरुपण संत , महंत , कथा - कीर्तनकार व भागवताचार्य आपल्या अनुभवातून व अभ्यासातून करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले . या सप्ताहाचा समारोप ह . भ . प . श्री उत्तम महाराज होळंबे यांच्या काल्याचे कीर्तनाने झाला . यावेळी माणिक नगर भागातील भाविक भक्त महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते .  हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी माणिक नगर भागातील महिला मंडळ यांनी सप्ताहाच्या आयोजन व नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!