MB NEWS:गोविंद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सोमनवाडी ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात

 सोमनवाडी गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी भरपूर निधी देऊ-पंकजाताई मुंडे


गोविंद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सोमनवाडी ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात 

 


सोमनवाडी गावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध- सौ. युमना शिवाजी सोनवणे 



अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- 

           अंबाजोगाई तालुक्यातील सोमनवाडी ग्रामपंचायत महाराष्ट्र राज्याच्या माजी मंत्री व भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व निर्माण केले आहे. गोविंद सोनवणे यांनी उभा केलेल्या सोमनवाडी जनसेवा विकास    पॅनेलला 7 पैकी 7 जागेवर  व सरपंचपदी सौ. युमना शिवाजी सोनवणे यांच्या दणदणीत विजय झाला आहे. ग्रामपंचायतीवर पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलची सरशी झाली असून. सोमनवाडी ग्रामपंचायतही पंकजाताईंच्या ताब्यात आली आहे.सोमनवाडी गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी भरपूर निधी देऊ  असे आश्वासन पंकजाताई मुंडे यांनी दिले. 

           सोमनवाडी ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान होऊन मंगळवार, दि.20 डिसेंबर  रोजी  तहसील कार्यालयात अंबाजोगाई येथे निकाल जाहीर करण्यात आला. सोमनवाडी जनसेवा विकास पॅनेलचे सरपंच पदाचे उमेदवार सौ. युमना शिवाजी सोनवणे यांची सरपंचपदी निवड झाली आहे. तर  सदस्यपदावर वार्ड क्र.1 चे मुक्ता नारायण किडमिडे, राजेंद्र नारायण भोसले, वार्ड क्र.2 चे इदुबाई वैजनाथ मुंडे, छायाबाई दत्तत्रय सोनवणे, मच्छिन्द्र माधव चाटे, वार्ड क्र.3 चे सुशीला बाबू ओटले, बाबुराव नाथराव सोनवणे यांचा निर्विवाद दणदणीत वर्चस्व स्थापित करून विजय प्राप्त झाला आहे.

        सोमनवाडी गावांच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. येथील शेतकरी, ग्रामस्थांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही. गावच्या विकासाला चालना देण्यासाठी भरपूर निधी देऊन , सरपंच व सदस्यांना ताकद देवू. गावाचा कायापालट या निमित्ताने आपण करणार असून या माध्यमातून गावाचा कायापालट करून इतर गावांपुढे विकासाचा आदर्श निर्माण करावा असे आवाहन करून गावाच्या विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.  ग्रामपंचायतच्या सरपंच व सदस्यांचा पंकजाताई मुंडेंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

       सोमनवाडी गावाच्या मनातील नायक  गोविंद सोनवणे यांच्या पॅनेलचे सरपंच पदाचे उमेदवार सौ. युमना शिवाजी सोनवणे अटीतटीच्या लढाईमध्ये प्रचंड बहुमताने निवडून आल्या. ग्रामस्थांनी व जनतेने तसेच वय वृद्ध व ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी संधी देऊन व मतदानरूपी आशिर्वाद दिले.पाखरांना परतीची तमा नसावी नजरे सदा नवी दिशा असावी घर त्याचं काय आहे बांधता येईल केव्हाही क्षितिजांची ही पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी अशा जिद्दीने प्रचंड मतांनी निवड आलेले सरपंच हे एक उमेदवार आहेत. विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी अभिनंदन केले व  पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.


सोमनवाडी ग्रामपंचायतला विकासाचे मॉडेल करू-गोविंद सोनवणे 


  परळी मतदार संघातील अंबाजोगाई तालुक्यातील सोमनवाडी ग्रामपंचायत या गावाला सर्वात सुंदर करून तालुक्यात विकासाचे मॉडेल म्हणून हे गाव पुढे आणण्याचा प्रयत्न असणार आहे. विकासाच्या अनेक संकल्पना व योजनां या ठिकाणी राबविण्याचे धोरण निश्चित केले असून तमाम मतदार बांधवांच्या सहकार्याने या ठिकाणी विकासकामे पूर्ण करण्यासाठी आपला पुढाकार असणार आहे असे मत नवनिर्वाचित सरपंच सौ. यमुना शिवाजी सोनवणे व पॅनल प्रमुख गोविंद सोनवणे यांनी व्यक्त केले.


*सोमनवाडी येथे भव्य मिरवणूकीने घेतले मतदारांचे आशिर्वाद*


       या न भुतो न भविष्यती विजयाबद्दल ग्रामस्थ आणि पॅनलच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. गावामध्ये जोरदार आतषबाजी करण्यात आली तर सरपंच आणि सर्व विजयी उमेदवारांची गावामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मतदारांचे आशिर्वाद घेऊन आभार व्यक्त केले. गावच्या विकासासाठी मी वचनबद्ध असुन गावामध्ये सामाजिक सलोखा राखणार आहे. सर्व समाजाचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय आहे. गावातील प्रत्येक नागरीकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी बांधिल असल्याचा शब्द नवनिर्वाचित सरपंच सौ. युमना शिवाजी सोनवणे, पॅनलचे गोविंद सोनवणे यांनी यावेळी दिला.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !