MB NEWS-संभाजी ब्रिगेडची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

 परळी शहरासाठी येणारा करोडो रुपयाचा निधी सीमा वासियांसाठी खर्च करण्यात यावा



 संभाजी ब्रिगेडची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी


परळी वै. (प्रतिनिधी) 

 शहारासाठी मागच्या काही वर्षांमध्ये कोटीवधी रुपये निधी  आला. पण तो निधी कुठे खर्च झाला..? त्या निधीपासून परळीचा काय विकास झाला..? हा एक संशोधनाचा भाग असून परळी साठी यापुढे निधी न देता तो निधी सीमा भागातील मराठी लोकांसाठी व तिथल्या सुख सुविधेसाठी खर्च करण्यात यावा. अशी पत्राद्वारे  संभाजी ब्रिगेडच्या वतीने मुख्यमंत्र्यांना मागणी केली आहे. सध्या महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद चालू असून हा वाद जास्तीत जास्त विकास निधीच्या अनुषंगाने त्या भागातील सुख सुविधाच्या अनुषंगानेच होत आहे. 



    अशा परिस्थितीत परळीला मागच्या काही वर्षांमध्ये कोट्यवधीचा निधी आला पण तो योग्य ठिकाणी न वापर करता त्याचा भ्रष्टाचार, बोगस काम आणि दोन पाच टक्के लोकांना कार्यकर्त्यांना जगण्यासाठीच तो निधी वापरण्यात आला असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडच्या वतीने तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी केला आहे. यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी परळी शहारा साठी यापुढे निधी देताना विचार करावा व तो निधी सीमाभागातील लोकांना देण्यात यावा. असे आव्हान सुद्धा संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.



.   सध्या परळीच्या भागात बघितले असेल तर भ्रष्ट करभारा शिवाय सर्वसामान्यांचे हित व दूरदृष्टी नसलेले राज्यकर्ते परळीला लाभले असून यामुळे या भागाला जेवढं प्रसिद्धीच्या माध्यमातून परळीचे नाव आहे. तेवढं या भागामध्ये जर आपण डोकावून बघितले तर कुठल्याही प्रकारची सुख सुविधा इथल्या राज्यकर्त्यांनी केलेली नाही. म्हणून यापुढे परळीला निधी न देता तो सीमा वासियांसाठी खर्च करण्यात यावा असे संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !