इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS-शिवैक्य विश्वनाथ संभाय्या स्वामी यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त

 शिवैक्य विश्वनाथ संभाय्या स्वामी यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त परळीत शिव सत्संगाचे आयोजन




परळी वैजनाथ /प्रतिनिधी


शिवैक्य विश्वनाथ संभाय्या स्वामी यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त श्री गुरुलिंग स्वामी मठ बेलवाडी येथे उद्या मंगळवार दिनांक 13 डिसेंबर रोजी शि.भ.प. गुंडय्या स्वामी राडीकर यांच्या ओजस्वी व सुमधुर वाणीतून भव्य शिव सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


श्री गुरुलिंग स्वामी मठ बेलवाडी येथे उद्या मंगळवार दिनांक 13 डिसेंबर रोजी शिवैक्य विश्वनाथ संभाय्या स्वामी यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त सकाळी दहा ते बारा या वेळेत श्री शि.भ.प. गुंडय्या स्वामी राडीकर यांच्या ओजस्वी व सुमधुर वाणीतून  भव्य शिव सत्संग कार्यक्रम  संपन्न होणार असून या कार्यक्रमास परळी शहर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महेश विश्वनाथ स्वामी व योगेश विश्वनाथ स्वामी यांनी केले आहे. .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या