MB NEWS-मी वीज वितरण कंपनीचा थकबाकीदार नाही- धनंजय मुंडे यांचा खुलासा

मी वीज वितरण कंपनीचा थकबाकीदार नाही- धनंजय मुंडे यांचा खुलासा



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

     वीज वितरण कंपनीची आपल्याकडे कोणतीही थकबाकी नाही त्यामुळे थकबाकीबाबत आपल्या नावाचा येणारा उल्लेख निराधार असल्याचे आमदार  धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. 



जाहीर खुलासा


काही वृत्तवाहिण्या राजकीय नेत्यांकडे विजेची थकबाकी या मथळ्याखाली बातम्या प्रसारित  करत असून त्यामध्ये माझ्या नावे महावितरण कडील ग्राहक क्र. 586480349169 या क्रमांकाच्या मीटरची 60 हजार रुपये थकबाकी असल्याचे प्रसारित केले जात आहे . 


 *हे वृत्त पूर्णपणे निराधार, चुकीचे व खोडसाळपणाचे आणि जाणीवपूर्वक बदनामी करणारे आहे.*


याबाबत वस्तुस्थिती अशी आहे की, ज्या शेतीमध्ये हे मीटर वापरले जात होते, ती मौजे मालनाथपुर (ता. परळी) येथील माझी शेती 2016-17 साली मी एका सोलर कंपनीला विकलेली आहे. तेथील वर नमूद ग्राहक क्रमांकाच्या मीटरवरील संपूर्ण थकबाकी 2019 च्या निवडणुकीपूर्वी पूर्णतः भरून दि. 01 ऑक्टोबर, 2019 रोजी महावितरणने बेबाकी प्रमाणपत्र दिलेले आहे.


 त्याचबरोबर ती शेती विकल्याने व माझा तिथे कोणताही विजेचा वापर नसल्याने मी महावितरण ला संबंधित कनेक्शन कायमचे बंद करण्याबाबत (permanently disconnect) दि. 15/09/2019 रोजी लेखी अर्जाद्वारे कळवले आहे. त्यामुळे सदर शेती मालकीची नाही, किंवा विजेचा कोणताही वापर अस्तित्वात नसताना वीजबिल थकबाकी असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 


माझ्या अन्य शेतीमध्ये देखील मी सौरऊर्जा आधारित शेती पंप वापरतो. तसेच आमच्या शेतातील लघु सौरऊर्जा प्रकल्पातून निर्मिती करण्यात आलेली उर्वरित वीज महावितरणला पुरवली जाते, याचीही माहिती आपणास असावी. 


*त्यामुळे विजेची थकबाकी असल्याचे वृत्त पूर्णपणे निराधार, चुकीचे व बदनामीकारक असून कृपया माध्यमांनी या प्रकारची वृत्त प्रसिद्ध करताना खातरजमा करून घ्यावी, ही नम्र विनंती.*

आपला

धनंजय मुंडे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !