MB NEWS :सरपंच व सदस्य यांचा पंकजाताई मुंडेंनी केला सर्वांचा सत्कार

 नंदनज ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात, सरपंचपदी शिवकन्या योगीराज गुट्टे यांच्यासह पाच सदस्यांचा विजय

सरपंच व सदस्य यांचा पंकजाताई मुंडेंनी केला सर्वांचा सत्कार



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा. डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली परळी तालुक्यातील नंदनज ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाचे उमेदवार शिवकन्या योगीराज गुट्टे यांच्यासह पाच उमेदवार बहुमताने विजयी झाले आहेत.  यशःश्री निवासस्थान सरपंच व सदस्यांचा पंकजाताईं मुंडे यांनी अभिनंदन करून सत्कार करण्यात आला.

     मंगळवार दि.20 रोजी जाहिर झालेल्या निकालात श्री संत केदारेश्वर जनसेवा विकास पॅनलचे  कै. योगीराज गुट्टे यांच्या पत्नी सरपंच शिवकन्या योगीराज गुट्टे यांच्यासह सदस्य म्हणुन सुनंदा  शिवाजी गुट्टे,सतीश बाबुराव गायकवाड, नाथराव हरिभाऊ गुट्टे, देवशाला सोमनाथ गुट्टे, अरविंद बापूराव गुट्टे हे सर्व बहुमताने विजय झाले आहेत.निकालानंतर विजयी उमेदवार व गावकर्यांनी नंदनज येथे विजयोत्सव साजरा केला.


  भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा. डॉ.प्रितमताई मुंडे यांनी सर्व नवनिर्वाचित सदस्य व सरपंच यांचे अभिनंदन केले असून, या विजयाचे शिल्पकार सुनील योगीराज गुट्टे यांचेही विशेष कौतुक केले आहे, तसेच आगामी काळात गावच्या सर्वांगीण व सर्वंकष विजयासाठी उत्तम कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच सर्व नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा गावकऱ्यांनी फुलांचा व गुलालचा वर्षाव करून शुभेच्छा दिल्या. दरम्यान एकच ध्यास गावाच्या सर्वांगिण विकास या प्रमाणे आम्ही काम करणार असल्याचे नूतन सरपंच शिवकन्या योगीराज गुट्टे यांनी सांगितले.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !