MB NEWS:इंजेगाव जि.प.शाळेत एक महिन्याच्या आत पिण्याच्या पाण्याची फिल्टर बसवून सोय करणार- सरपंच सौ.विद्या अमोल कराड

 इंजेगाव जि.प.शाळेत एक महिन्याच्या आत पिण्याच्या पाण्याची फिल्टर बसवून सोय करणार- सरपंच सौ.विद्या अमोल कराड




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-   

   तालुक्यातील इंजेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत नुकतेच सरपंचपदी विराजमान झालेले सौ. विद्या अमोल कराड यांनी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस भेट दिली.यावेळी त्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

     शाळेत भेट देऊन सौ. विद्या अमोल कराड यांनी शाळेतील अडीअडचणी समजून घेतल्या.समस्या‌ जाणून घेतल्या.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी त्यांचा सत्कार केला.शाळेतील समस्या कोणतीही असो ती तर सोडवणारच गावातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणार असे सांगून पिण्याच्या पाण्यासाठी एक महिन्याच्या आत बोअर घेऊन फिल्टर बसविण्यात येणार असल्याचेही सरपंच सौ. विद्या अमोल कराड यांनी सांगितले.



 बचत गटांचे प्रश्न प्रधान्याने सोडवू - सरपंच सौ.विद्या अमोल कराड


तालुक्यातील इंजेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत नुकतेच सरपंचपदी विराजमान झालेले सौ. विद्या अमोल कराड यांनी आज गुरुवार दि.22 डिसेंबर पासून कामाला सुरुवात केली. गावातील सर्व महिला बचत गटांना भेट दिली असता त्याचा सत्कार करण्यात आला. तसेच बचत गटांच्या कोणताही प्रश्न असो किंवा अडचणी सोडवू तसेच त्याचे प्रशन ही जाणून घेतल्या बचत गटाच्या ग्राम संघाच्या ऑफिसला 15 दिवसाच्या आता लाईट फिटिंग व दरवाजे खिडक्यांची दुरुस्ती व विविध प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी कटीबधद असल्याचे नवनिर्वाचित सरपंच सौ.विद्या अमोल कराड यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार