MB NEWS:ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुतेंची तब्येत बिघडली, विधिमंडळातून थेट हॉस्पिटलमध्ये भरती

 ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुतेंची तब्येत बिघडली, विधिमंडळातून थेट हॉस्पिटलमध्ये भरती


नागपूर : माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार यांची प्रकृती खालावल्याने त्यांना विधान भवनातून रुग्णवाहिकेत टाकून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 


बबनराव पाचपुते यांना आज दुपारी विधान भवनात श्वसनाचा त्रास सुरू झाला. बबनराव पाचपुते मागील अनेक दिवसांपासून आजारी आहेत. सार्वजनिक जीवनातला त्यांचा वावरही कमी झाला आहे. मात्र अधिवेशनाच्या निमित्ताने ते नागपुरात आले आहेत. बबनराव पाचपुतेंना आज त्रास सुरु झाल्यावर त्यांच्या सहकाऱ्यांनी परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना नेलं. तिथे डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. त्यात त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने डॉक्टरांनी शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. परंतु पाचपुतेंच्या विनंतीवरून त्यांना खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. तुर्तास त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. 


रुग्णवाहिका फसली 


बबनराव पाचपुते यांना रुग्णालयात दाखल करून रुग्णवाहिका परत विधान भवन परिसरात आली. विधान भवनाच्या मागच्या द्वारातून आत येत असताना एक गटाराच्या चेंबरमध्ये मागचे चाक फलसे. लोकांनी धक्का मारून तिला बाहेर काढले. 


कोण आहेत बबनराव पाचपुते?

बबनराव पाचपुचे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत, गेल्या ३५ वर्षांपासून ते आमदार आहेत.एकेकाळचं राष्ट्रवादीतलं मोठं नाव, शरद पवार यांचे जवळचे सहकारी राहिले पण आदिवासी विभागात भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलायाआधी त्यांनी गृहराज्यमंत्री, वनमंत्री, आदिवासी विकास विभागाची धुरा सांभाळली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !