MB NEWS-ऊसतोडणीला जाताना अपघातात मृत्यू झालेल्या गिरे कुटुंबास आर्थिक मदत द्या - धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांना मागणी

 ऊसतोडणीला जाताना अपघातात मृत्यू झालेल्या गिरे कुटुंबास आर्थिक मदत द्या - धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांना मागणी




मृतांना प्रत्येकी 10 लाख तर जखमींना प्रत्येकी 5 लाखांची मदत करण्यात यावी - धनंजय मुंडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र


ऊसतोड कामगार महामंडळाला गती देऊन, ऊसतोड कामगारांसाठी अपघात विमा योजना सुरू करा - धनंजय मुंडे यांची पुन्हा एकदा मागणी


मुंबई (दि. 02) - नांदगाव जि. नाशिक येथील ऊसतोड कामगार गोविंद गिरे हे आपल्या कुटुंबासह बैलगाडीतून ऊसतोडणीला जात असताना दि. 29 नोव्हेंबर रोजी पहाटे पुणे-औरंगाबाद महामार्गावर एसटी बसची धडक लागून गोविंद गिरे यांची पत्नी व दहा वर्षीय मुलगा या अपघातात मृत्युमुखी पडला होता. तर ऊसतोड कामगार गोविंद गिरे व त्यांचा दुसरा मुलगा गंभीर जखमी असून, या अपघातात मृत्यू पावलेल्या ऊसतोड कामगार कुटुंबातील दोघा जणांना प्रत्येकी दहा लाख रुपये तसेच गंभीर जखमी असलेल्या दोघा जणांना प्रत्येकी 5 लाख तसेच या अपघातात ठार झालेल्या बैलाच्या नुकसान भरपाई पोटी एक लाख रुपये अशी मदत संबंधित ऊसतोड कामगाराच्या कुटुंबाला राज्य सरकारने करावी अशी मागणी माजी सामाजिक न्याय मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.


धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिले असून दोन दिवसांपूर्वी त्यांनी या संदर्भात एक ट्विटही केले होते. 


उसतोडणीला जात असताना वाटेत एसटी बसने धडक देऊन 2 व्यक्तींचा मृत्यू झाला तर अन्य दोन गंभीर जखमी आहेत, मात्र राज्य सरकारने अद्याप ऊसतोड कामगारांच्या या अपघाताची दखल घेतल्याचे दिसत नाही. 


मात्र धनंजय मुंडे यांनी या अपघातात अख्खे कुटुंब उध्वस्त झालेल्या गोविंद गिरे यांना राज्य सरकारने तात्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या कामास राज्य सरकारने गती द्यावी, अशी मागणी यानिमित्ताने धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा केली आहे. 


ऊसतोड कामगारांना सतत लहान मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागते, तसेच उसतोडणीला गेलेल्या महिलांच्याही आरोग्यविषयक अनेक समस्या असतात, याचा विचार करून ऊसतोड कामगारांना सुरक्षा मिळेल अशी सर्वव्यापी अपघात व आरोग्य विमा योजना महामंडळाच्या माध्यमातून कार्यान्वित करण्यात यावी, याबाबत महामंडळाची तातडीने बैठक घ्यावी, अशीही मागणी धनंजय मुंडे यांनी पत्राद्वारे केली आहे. 


महाविकास आघाडी सरकारच्या काळात नावारूपाला आलेले ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर पुन्हा एकदा झाकाळले गेले असल्याचे दिसून येते. ऊसतोड कामगारांची नोंदणी प्रक्रिया, नव्याने मंजूर वसतिगृहे यासह प्रस्तावित असलेल्या विविध योजना हे पूर्णपणे ठप्प असून, याबाबत धनंजय मुंडे हे सरकारकडे वारंवार मागणी करत आहेत.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार