MB NEWS-मुख्यमंत्र्यांच्या बहिणीला पोलिसांनी कारसह क्रेननं उचललं; वातावरण तापलं

 🅾️ मुख्यमंत्र्यांच्या बहिणीला पोलिसांनी कारसह क्रेननं उचललं; वातावरण तापलं





हैदराबाद: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या बहिणीची कार हैदराबाद पोलिसांनी क्रेननं उचलली आहे. विशेष म्हणजे जगन यांची बहिण वायएसआरटीपीच्या प्रमुख शर्मिला रेड्डी कारमध्ये असताना हा संपूर्ण प्रकार घडला. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी शर्मिला रेड्डी गेल्या होत्या. त्यावेळी हा प्रकार घडला.


हैदराबादमधील सोमाजीगुडा परिसरात संपूर्ण घटना घडली. शर्मिला रेड्डींनी केसीआर यांच्या घराला घेराव घालण्याची घोषणा केली होती. आंदोलन करत असलेल्या शर्मिला यांना ताब्यात घेण्यातचा प्रयत्न पोलिसांनी केला. पोलिसांनी त्यांना १ किलोमीटर आधीच रोखलं. शर्मिला रेड्डी स्वत:चं एसयूव्ही कार चालवत होत्या.



पोलिसांनी कार थांबवल्यानंतर शर्मिला यांनी कार आतून लॉक केली. पोलिसांनी लॉक तोडण्यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र त्यांना यश मिळालं नाही. त्यामुळे त्यांनी कार टो केली. शर्मिला रेड्डी आंध्र प्रदेशच्या जगन मोहन रेड्डी यांच्या भगिनी आहेत. त्यांचे वडील वाय एस राजशेखर रेड्डी अविभाजित आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. जुलै २०२१ मध्ये रेड्डी यांनी वायएसआर तेलंगणा पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली.



एक दिवसापूर्वीच अज्ञातांनी शर्मिला यांच्यावर हल्ला केला होता. त्यांच्याविरोधात शर्मिला गो बॅक अशा घोषणा दिल्या. घोषणाबाजी करणाऱ्यांनी ज्वलनशील पदार्थ टाकून बस पेटवली. त्यावेळी बसमध्ये २० जण होते. ते वेळीच खाली उतरले. त्यामुळे अनर्थ टळला. शर्मिला कार्यकर्त्यांसोबत नरसम्पेटा येथे जेवणासाठी थांबल्या होत्या. त्यावेळी ही घटना घडली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार