MB NEWS-बीड एसीबीच्या कारवाईने खळबळ

 सिरसाळा: दहा हजाराची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षकास पकडले




बीड एसीबीच्या कारवाईने खळबळ

बीड |सिरसाळा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना पकडला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 8) दुपारी बीड एसीबीच्या टीमने केली आहे.






       बीड पोलिस दलात लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस अधिक वाढतच आहे. दोन दिवसापूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक व अंमलदारास लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यांनतर या दोघांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली. तोच सिरसाळा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना पकडला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 8) दुपारी बीड एसीबीच्या टीमने केली आहे. या घटनेने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. प्रकाश शेळके असे असे लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. तक्रारदाराला दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी 25 हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यातील 10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे..





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार