MB NEWS-मातोश्री वृद्धाश्रमात "करिष्मा कुदरत का'" पुस्तकाचे प्रकाशन .

 मातोश्री वृद्धाश्रमात "करिष्मा कुदरत का'" पुस्तकाचे प्रकाशन 


 देशभक्ती व समाजात घडत असलेल्या वेगवेगळ्या विषयांवर लिखाण करणारे शिक्षक व सैनिक या दोन्ही भुमीका प्रभाविपणे निभावणारा,परिवार प्रेमी,कुटुंब वत्सल लातूर जिल्ह्यातील पहिला कवि म्हणजे अरविंद फुलारी होत असे प्रतिपादन डॉ.रणजित जाधव यांनी केले.



 नुकताच मातोश्री वृध्दाश्रम लातूर येथे अरविंद फुलारी लिखीत 'करिश्मा कुदरत का ' या त्यांच्या चौथ्या पुस्तकाचे प्रकाशन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन बोलताना व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पन्नगेश्वर शुगर मिल्सचे माजी चेअरमन किशनराव भंडारे होते तर प्रमुख अतिथी म्हणुन प्रा.नयना राजमाने,गझलकार सुरेश गिर,माजी प्राचार्य दादागिरी कांबळे,माजी शिक्षण उपसंचालक, मुदाळे,माजी शिक्षण अधिकारी पी. आर. गायकवाड, पानगावचे माजी सरपंच प्रदिप कुलकर्णी, माजी जिल्हा परिषद सदस्य ईश्वर गुडे, माजी सभापती चंद्रचुड चव्हाण,माजी सरपंच सुकेश भंडारे,शिवसेना रेणापुर तालुका प्रमुख गोविंद दुड्डे, माजी प्राचार्य वसंत कुरकुट, चंद्रकात आरडले, पानगाव व्यापारी संघटनेचे सचिव माऊली गुरव, म.ब.स. संस्थेचे अध्यक्ष ऊत्तरेश्वर हालकुडे आदींची प्रमुख उपस्थिती  होती.



 पुढे बोलताना डॉ.जाधव म्हणाले की, शिक्षक हा समाज घडवण्याचे पिढी सुसंस्कृत करण्याचे काम करत असतात तर सैनिक हे देशाचे रक्षण करण्याची जबाबदारी पार असतात परंतु या दोन्ही भुमीका प्रभावीपणे निभावत एक हळवा कवीही दिसुन येतो. माणसांनी जिवन कसे जगावे, आयुष्यात दुःख हे पहाडासारखे आहेत परंतु सुख मात्र फार कमी पाहावयास मिळते.पत्निच्या मृत्यू नंतर चारही पुस्तकाचे लिखाण केले भावनांचे वर्णन शब्दातून केले आहे. शिक्षक हा संवेदनशील असतो समाजातील दुःख पाहुन कवि हळहळतो व त्याचे वर्णन आपल्या कवितेतून करतो. पत्नीच्या विरहातुन कमलापती नावाने काव्य लिहीले.दुख्खी, विरहात जिवन जगणार्यांनी 'करीष्मा कुदरत का' हा कविता संग्रह अवश्य वाचावा.जगण्यातील सुख-दुःख,जबाबदारी, विरह,देशप्रेम,आदींची या कविता संग्रहात मांडणी केली आहे तर विविध भारती आकाशवाणीचाही कवितावर प्रभाव दिसुन येतो असे मत व्यक्त केले. 




प्रा. नयना राजमाने मत मांडताना म्हणाल्या कि, मुखपृष्ठावरचे निसर्गाचे अतिशय सुंदर चित्र रेखाटले आहे कविता मधुन परीवाराबाबत लिखाण केले असून परिवारातील सर्वांचा यात उल्लेख केला आहे हे फार कमी कवीच्या लिखाणातून निदर्शनास येते. पत्नीच्या विरहाचे कवितेच्या माध्यमातून लिखाण केले आहे. असे मत व्यक्त केले तर गझलकार सुरेश गिर बोलताना म्हणाले कि कवि संवेदनशील असतात स्वभावातुन कविचे लिखान दिसुन येते. मुख्यपृष्ठावर ईंद्रधनुष्य आहे त्यातील रंगा प्रमाणेच कवितेच्या माध्यमातून नऊ रंग दिसुन येतात. कवितेच्या माध्यमातून सर्वांग वर्णन केले असुन अतिशय सुंदर मांडणी केली आहे. कवि अरविंद फुलारी यांनी मनोगत व्यक्त करताना २०१७ मध्ये हैद्राबाद येथिल  दैनिक हिंदी मिलाप ,स्वतंत्र वार्ता या दैनिकाला पहिली कविता 'करीष्मा कुदरत का' पाठवली व पहीला पुरस्कार मिळाला. जे आहे-जे मिळाले-जे कमावले-गमावले जे दिसले-पाहीले-अनुभवले तेच माझ्या लिखाणातून शब्द रुपी बाहेर आले हा निसर्गाचाच चमत्कार आहेअसे मी मानतो माझे काहीच नाही असे मनोगत व्यक्त केले. 




अध्यक्षीय समारोपात किशनराव भंडारे म्हणाले स्व.स्वातंत्र सैनिक गणपतराव फुलारी यांचे सुपुत्र राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त, माजीसैनिक,आत्मकथा लेख" रणांगणकार"कवि हे पानगावचे भुषण आहे.यावेळी ऊपस्थित अनेक मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.यावेळी निवृत्त शिक्षक,चन्नप्पा मुदगडे,कालिदास पाठक,खंडुजी शेरखाने,किशनराव फुलारी,राजाराम बिलोलीकर,महेश हालकुडे,विवेक चव्हाण, अभिजित चव्हाण, संतोष पाठक, सुरेश फुलारी,अनंत पाटील यांच्यासह फुलारी परिवारातील सर्व सदस्य व आश्रमातील वयोवृद्ध माता,पिता मोठ्या संख्येने उपस्थित होते. 




विशेष म्हणजे परळीतील मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी आणि जेष्ठ कवी साहित्यिक आबासाहेब वाघमारे पदाधिकारी प्रा. डॉ. यल्लावाड ,कवि व शाहीर अनंत मुंडे ,कवि प्रा.संजय आघाव सुप्रसिद्ध चारोळीकार .बा सो.कांबळे सुप्रसिद्ध कवी प्राचार्य अरुण पवार यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून या कविता संग्रहाचे वेळोवेळी अवलोकन व मार्गदर्शन केलेले आहे.यात या कविंच्या मराठी कविता हिन्दीत अनुवादित केलेल्या आहेत. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षण विभाग कळंब शिक्षण विस्तार अधिकारी सुशिल फुलारी यांनी केले तर आभार सौ. मंजुषा फुलारी यांनी मानले. मातोश्री वृध्दा्श्रमातील आजी-आजोबांसोबत स्नेहभोजनाने या कार्यक्रमाचा समारोप झाला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !