परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
तालुक्यातील कसत असलेल्या गायरान जमीन शेतकऱ्यांच्या नावे करून द्याव्या : भास्कर रोडे
परळी : तालुक्यातील गोरगरीब कष्टकरी लोक गायरान जमिनीवरती मेहनत करून तिला कसून त्यातून उत्पादन मिळवून आपली उपजीविका भागवतात अशा लोकांचा विचार करून त्या गायरान जमिनी शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या नावी करून देण्यात याव्या अशी मागणी रिपाईचे ज्येष्ठ नेते भास्कर रोडे यांनी केली आहे.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आदेशानुसार 30 डिसेंबर पर्यंत गायरान अतिक्रमण जमीन बाबत अहवाल मागवीत आहे. त्याकरता आज रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार राज्य सरकारने सदैव निर्णयाचा विरोधी पुनर्विचार याचिका दाखल करावी. २०२० पर्यंत गायरान जमीन करणारे गोरगरीब लाभधारक आहेत अशा सर्व लाभ धारकांना कष्टकरी यांच्या नावे करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे देण्यात आली असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राज्य सचिव भास्कर रोडे यांनी दिली आहे.
यावेळी रिपाईचे मराठवाडा विभागीय सचिव प्रा. दासु वाघमारे, जेष्ठ नेते गंगाधर रोडे, जेष्ठ नेते दशरथ शिंदे, प्रवीण कसबे,सुभाष कसबे, जनार्धन मुंडे ,राम मुंडे , सोमीनाथ रोडे,अमोल रोडे,प्रशांत रोडे, विशाल रोडे, पांडुरंग घाडगे व तसेच कन्हेरवाडी, परळी,वानटाकळी, गोवर्धन हिवरा सह सर्व तालुक्यातील गायरान धारक उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा