MB NEWS:मध्य प्रदेश सरकारच्या संस्कृती विभाग अंतर्गत असलेल्या मराठी साहित्य अकादमीचे मानाचे पुरस्कार

 मध्य प्रदेश सरकारच्या संस्कृती विभाग अंतर्गत असलेल्या मराठी साहित्य अकादमीचे मानाचे पुरस्कार


'असो आता चाड', 'कदाचित' ला भा.रा.तांबे पुरस्कार जाहीर


भोपाळ :
लेखक संदीप शिवाजीराव जगदाळे (पैठण, औरंगाबाद) लिखित ‘असो आता चाड’ या कवितासंग्रहाला तर, बा.बा.कोटंबे (परभणी) लिखित ‘कदाचित’ या कादंबरीला वर्ष २०१९ चा भा.रा.तांबे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मध्य प्रदेश सरकारच्या संस्कृती विभाग अंतर्गत असलेल्या मराठी साहित्य अकादमीच्या वतीने दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात.

अकादमीच्या वतीने २०२० साठीचे पुरस्कार देखील जाहीर करण्यात आले असून पुण्याचे योगेश सोमण यांच्या ‘सुपारी.कॉम’ या नाटकासाठी तर, पुण्याच्याच सुचिता घोरपडे यांच्या ‘खुरपं’ या कथासंग्रहाला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.मराठी गौरव दिनी, भोपाळ येथे या पुरस्कारांचे वितरण केले जाईल, अशी माहिती मराठी साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात आली आहे. ५१ हजार रुपये, प्रशस्तीपत्र, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !