MB NEWS:परळीसह जिल्हयातील सरपंच, सदस्यांची अक्षरश: रिघ

 यशःश्रीवर विजयाचा आनंदोत्सव..!



पंकजाताई मुंडेंनी केला नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार



परळी वैजनाथ ।दिनांक २२।

भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली परळी मतदारसंघासह बीड जिल्ह्यातील 75 टक्के पेक्षा अधिक ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला आहे. या यशानंतर परळी मतदारसंघासह जिल्हयातील विविध गावचे नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांची आज दिवसभर यशःश्री निवासस्थानावर अक्षरशः रीघ  लागली होती. या सर्वांचे स्वागत व अभिनंदन पंकजाताई मुंडे यांनी केले.

         

ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्यातील 75 टक्के पेक्षा अधिक ग्रामपंचायतवर भाजपाचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. त्याचबरोबर परळी मतदारसंघातील 60% हून अधिक जागा पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या ताब्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे परळी मतदारसंघातील सिरसाळा, नागापूर, घाटनांदुर, बर्दापूर, जवळगाव यासारख्या मोठ्या ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आलेल्या आहेत. या भरघोस यशानंतर प्रत्येक गावातील विजेते सरपंच व उमेदवार विजयाचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आपल्या लाडक्या नेत्या पंकजाताई मुंडे यांची भेट घेण्यासाठी यश:श्री बंगल्यावर दाखल झाले होते

प्रत्येक विजेत्याचे स्वागत व अभिनंदन पंकजाताई मुंडे यांनी केले. घाटनांदुर चे सरपंच महेश गारठे, सिरसाळाचे सरपंच सय्यद अन्वर पट्टेदार, जवळगावचे सतीश आरे, गिताचे अंगद मलवाड, कुसळवाडी उषा सलगरे, धसवाडी मीना गायकवाड, पुसच्या ज्ञानेश्वरी पवार आदींसह जिल्हयातील विविध गावचे सरपंच व सदस्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.


*ऐतिहासिक विजय*

-----------

हा विजय कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा व जनतेची आपल्यावरील विश्वासाची पावती असल्याचे पंकजाताई मुंडे यांनी सांगितले. घाटनांदुर, सिरसाळा, नागापूर मधील विजय हे ऐतिहासिक आहेत. जनतेने झुंडशाही झुगारून आमच्या सर्व सामान्य उमेदवाराला पसंती दिली.  कुणी काहीही दावा केला तरी बीड जिल्ह्यातील जनतेने बीड जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला होता, आहे व भविष्यातही राहणार असल्याचे संकेत या ग्रामपंचायत निवडणुकीच्या यशातून दिले आहेत. यापुढे कोणत्याही निवडणुकीत गुलाल आपल्याला अंतर देणार नाही असा आत्मविश्वास यावेळी सर्वांसमोर बोलताना पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केला.

••••



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार