MB NEWS:सानिया मिर्झाची आकाशाला गवसणी, बनणार भारताची 'पहिली मुस्लिम महिला फायटर पायलट'

 सानिया मिर्झाची आकाशाला गवसणी, बनणार भारताची 'पहिली मुस्लिम महिला फायटर पायलट'




भारतातील एका छोट्याशा खेड्यातील एका टीव्ही मेकॅनिकची मुलगी सानिया मिर्झा भारताची पहिली मुस्लिम फायटर पायलट होण्यास सज्ज झाली आहे. तिने नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी परीक्षेत 149 वी रँक मिळवत आकाशाला गवसणी घातली आहे. तर एनडीएमधील महिलांसाठी राखीव असलेल्या 19 जागांमध्ये सानियाने दुसरे स्थान पटकावले आहे.


सानिया ही उत्तर प्रदेशच्या देहात कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या जसोवर नावाच्या छोट्या गावातील एक टीव्ही मेकॅनिक शाहीद अली यांची ती मुलगी आहे. तीने तिच्या गावातील पंडित चिंतामणी दुबे इंटर कॉलेजमधून हायस्कूल पूर्ण केले. दहावीनंतर बारावी पूर्ण करण्यासाठी मिर्झापूर शहरातील गुरु नानक गर्लस् इंटर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. एनडीएची परीक्षा क्रॅक करणारी सानिया ही जिल्ह्यातील यूपी बोर्डात बारावीतही टॉपर होती. एप्रिल 2022 मध्ये ती या प्रतिष्ठित एडीए परीक्षेला बसली आणि 149 व्या क्रमांकाने ती उत्तीर्ण झाली. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील खडकवासला एनडीएमध्ये तिला ती 27 डिसेंबर 2022 ला सामील होणार आहे. जर इथून पुढचे सर्व प्रशिक्षण व्यवस्थित पार पडले तर सानिया मिर्झा भारतीय वायुसेनेतील पहिली मुस्लीम सेनानी ठरणार आहे.

      आपल्या या यशाबद्दल बोलताना सानियाने एनआयला सांगितले, ”मला फ्लाइट लेफ्टनंट अवनी चतुर्वेदीकडून खूप प्रेरणा मिळाली. मी तिला पाहूनच एनडीएमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. मला आशा आहे की तरुण पिढीला माझ्याकडून प्रेरणा मिळेल.”

“फायटर पायलट विंगमध्ये महिलांसाठी फक्त दोन जागा राखीव होत्या. पहिल्या प्रयत्नात मी जागा मिळवण्यात अयशस्वी ठरले. मात्र, दुसऱ्या प्रयत्नात मला जागा मिळवण्यात यश आले,” असे सानिया मिर्झाने  सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार