MB NEWS-डॉ.पी एल कराड यांची विद्या परिषदेसाठी सलग दुसऱ्यांदा निवड

 डॉ.पी एल कराड यांची विद्या परिषदेसाठी सलग दुसऱ्यांदा निवड


परळी प्रतिनिधी ---जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमधील शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक ,डॉ. पी एल कराड यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांनी घेण्यात आलेल्या प्राधिकरणाच्या निवडणुकीमध्ये उत्कर्ष पॅनलच्या माध्यमातून विद्या परिषदेकरिता प्रचंड बहुमतांनी नुकताच विजय मिळविला. 



डॉ.पी एल कराड यांचे व्यक्तिमत्व मनमिळाऊ स्वभावाचे, उत्तम कार्यप्रणाली त्यांच्याकडे असल्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कार्यक्षेत्रातील सर्व प्राध्यापकांनी या निवडणुकीमध्ये त्यांना प्रचंड बहुमताने निवडून दिले. या निवडणुकीमध्ये त्यांना 1185 मते प्राप्त झालेली आहेत. या निवडीचे श्रेय त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्व प्राध्यापकांना दिले आहे असे यावेळी बोलताना सांगितले. या निवडणुकीतील यशाबद्दल डॉ.पी एल कराड यांचे आ.धनंजयजी मुंडे साहेब ,आ.सतीश चव्हाण ,आ. विक्रम काळे, उत्कर्ष पॅनलचे निमंत्रक व प्रमुख डॉ. शिवाजीराव मदन सर जवहार शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.सदाशिवआप्पा मुंडे, उपाध्यक्ष प्रा.टी.पी मुंडे सर ,प्राचार्य डॉ.डी व्हि मेश्राम, उत्कर्ष पॅनलच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले असे डॉ.राजेश करपे ,डॉ. मुंजा धोंडगे यांच्यासह श्री प्रदीप खाडे वैद्यनाथ महाविद्यालयाचे उपप्राचार्य हरीश मुंडे व सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !