इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:राष्ट्रीय गणित दिनानिमित्त गणित व विज्ञान प्रदर्शन संपन्न

 महाराष्ट्र विद्यालय हे उपेक्षितांच्या आधार : प्रा.डॉ.माधव रोडे




 राष्ट्रीय गणित दिनानिमित्त गणित व विज्ञान प्रदर्शन संपन्न


परळी / प्रतिनिधी 


सहा दशकापासून महाराष्ट्र विद्यालय शेतकरी, शेतमजूर व उपेक्षितांचा म्हणून कार्य करीत असून या विद्यालयात विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत माणूस म्हणून कसे जीवन जगावे याचे ज्ञान दिले जाते असे मत परळी येथील वैद्यनाथ महाविद्यालयाचे भौतिक शास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.माधव रोडे यांनी व्यक्त केले.राष्ट्रीय गणित दिनानिमित्त आयोजित एक दिवसीय गणित व विज्ञान प्रदर्शन कार्यक्रम प्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते उपस्थित होते.


ग्रामीण भागातील सर्वात मोठी व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा संचलित महाराष्ट्र प्राथ,माध्य व उच्च माध्य विद्यालयात गणित व विज्ञान विभागाच्या वतीने 'राष्ट्रीय गणित दिन 'मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात आला. या उदघाटन प्रसंगी परळी पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी नवनाथ सोनवणे हे उदघाटन म्हणून, संस्थेचे सचिव एड.अजय बुरांडे,जेष्ठ संचालक सुदामदादा देशमुख, सुदाम शिंदे,पार्डीकर महाविद्यालयाचे प्रा.झिंजुर्डे, घुले सर,शाळेचे प्राचार्य धनंजय देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


पुढे बोलताना प्रा.डॉ.रोडे म्हणाले की, आपल्या जीवनातील प्रत्येक घटकाचा मूलाधार गणित हाच आहे. गणिताशिवाय जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात आपण प्रगती करू शकत नाही.प्रत्येक विद्यार्थ्याला का?कसे? असे प्रश्न मनात निर्माण झाले तरच विद्यार्थी प्रगती करू शकतो.यामुळे विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत.असे मार्गदर्शन करताना मनोगत व्यक्त केले तर ग्रामीण भागात देखील गुणवत्तापूर्ण शिक्षण देत विविध उपक्रम राबवून आपली वेगळी ओळख निर्माण करणारी शाळा म्हणजे महाराष्ट्र विद्यालय आहे असे मत परळी पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी नवनाथ सोनवणे यांनी आपल्या उदघाटन प्रसंगी व्यक्त केले.या प्रसंगी संस्थेचे सचिव एड.अजय बुरांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपले विचार मांडले. 


या कार्यक्रमात विज्ञान व गणित विभाग विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले ज्यामध्ये 

विद्यार्थिनींनी तयार केलेल्या भित्तिपत्रकाचे विमोचन, कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे ज्ञान कक्ष, पुस्तक प्रदर्शन, विद्यार्थी बचत बँक, विविध वैज्ञानिक व गणितीय प्रयोग सादर करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक अंगद पेड्डेवाड, प्रास्तावित गणित शिक्षक गणेश कुरे व आभार व्यक्त सुहास चंदनशिव यांनी केले.


●150 पेक्षा अधिक गणितीय व विज्ञान प्रयोगाचे विद्यार्थ्यांकडून सादरीकरण


● व्यवहार ज्ञान समजण्यासाठी घेण्यात आलेली आनन्दनगरी ठरली लक्षवेधी


● विविध मैदानी खेळातून शालेय विद्यार्थ्यांकडून गणितीय संकल्पना सादरीकरण


● मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी व पालकांचा सहभाग

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!