MB NEWS-परळी वैजनाथ कॉरिडॉर संकल्पनेला पूजाने दिला पाठिंबा, तसेच या संकल्पनेचा प्रचार प्रसार करण्याची दिली ग्वाही

 योग प्रसारासाठी बारा ज्योतिर्लिंग दौऱ्यावर असणाऱ्या सायकलिस्ट पूजा बुधावलेंनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन

परळी वैजनाथ कॉरिडॉर संकल्पनेला पूजाने दिला पाठिंबा, तसेच या संकल्पनेचा प्रचार प्रसार करण्याची दिली ग्वाही


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) महाराष्ट्र कन्या पूजा तान्हाजी बुधावले ही भगिनी सायकलवर बारा ज्योतिर्लिंगांचा प्रवास करत आहेत. 'योग मेरा कर्म, एकता मेरा धर्म' या संकल्पनेचा प्रचार प्रसार करत पूजा भारत भ्रमण करत आहेत. योग प्रसारासाठी बारा ज्योतिर्लिंग दौऱ्यावर असणाऱ्या सायकलिस्ट पूजा बुधावलेंनी गुरुवार १५ डिसेंबर रोजी प्रभू वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन घेतले.


प्रभू वैद्यनाथ कॉरिडॉर समितीच्यावतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी कॉरिडॉरची संकल्पना जाणून घेतली. त्यांनंतर काशी विश्वनाथ, उज्जैन महाकाल च्या धर्तीवर प्रभू वैद्यनाथ कॉरिडॉर व्हावे व त्यामध्ये आंतरराष्ट्रीय योगसाधना केंद्र व्हावे अशी ईच्छा यावेळी बोलताना व्यक्त केली. त्यांच्या प्रवासा दरम्यान त्या आपल्या संकल्पनेला भारतभर नेतील यात शंका नाही.


#आस्थाजगाचीअस्मितापरळीवैद्यनाथची ही परळी वैजनाथच्या रहिवाश्यांच्या 'मन की बात' भारतभर पोहचवू असे पूजाने सांगितले. परळी वैजनाथमध्ये विविध संघटना आणि संस्थांनी तसेच नागरिकांनी जागोजागी उत्साहाने पूजा बुधावले व त्यांचे सहकारी समीर तळेकर यांचे जल्लोषात स्वागत करत त्यांना प्रोत्साहन दिले यावेळी महिलांची विशेष उपस्थिती होती. 

Click:

● *"योग मेरा कर्म-एकता मेरा धर्म "

 संकल्पनेच्या प्रसाराला सायकल परिक्रमा करीत निघालिय "पुजा".* • _वैद्यनाथ कॉरिडॉर व्हायलाच हवा- व्यक्त केला मनोदय_ #mbnews #subscribe #like #share #comments



*कोण आहेत पूजा बुधावले?*

◆मूळ देहू गांव, जि. पुणे येथील पूजा यांनी २०१७ मध्येही जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी असा सायकल प्रवास केला आहे. लॉकडाऊनमध्ये स्वतः योगा शिकत व शिकत असताना त्यांना संकल्पना सुचली की भारतातील १२ ज्योतिर्लिंग यात्रा सायकलवर करायची. 

◆ त्या अनुषंगाने ऑक्टोबर २०२२ पासून आजवर परळी वैजनाथपर्यंत त्यांनी ९ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेत योग प्रचार प्रसार करत यशस्वीपणे ५००० किलोमीटरचे अंतर पार केले आहे. यापुढे त्या औंढा नागनाथ, श्रीशैल्यम मल्लिकार्जुन व रामेश्वर असा जवळपास ३००० किमी चा प्रवास करण्यासाठी मार्गस्थ झाल्या आहेत.

◆ ही यात्रा पूर्ण केल्यावर पूजा बुधावले योग प्रसार करत बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन सायकलवर प्रवास करणाऱ्या जगातील पहिल्या महिला सायकलिस्ट होतील.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !