MB NEWS-दिव्य ज्योति जाग्रति संस्थान परळीच्या भव्य सत्संग, प्रवचन व भजन संकीर्तन कार्यक्रमास भाविकांची अलोट गर्दी

 दिव्य ज्योति जाग्रति संस्थान परळीच्या भव्य सत्संग, प्रवचन व भजन संकीर्तन कार्यक्रमास भाविकांची अलोट गर्दी


गुरू-शिष्य परंपरेतूनच विश्वात्मक कल्याण साध्य होते-स्वामी नरेंद्रानंदजी



सदगुरू ईश्वराचा साक्षात्कार करतो-स्वामी चिदानंदजी


*परळी वैजनाथ (प्रतिनिधी)*


भारत हा गुरू परंपरेवर विश्वास ठेवणारा, त्यांना मानणारा असून गुरू-शिष्य परंपरेतूनच विश्वात्मक कल्याण साध्य होते. अर्थातच श्रद्धा, विश्वास, विनम्रता व शालीनता शिष्यात असणे आवश्यक असून अशा सदाचारी व्यक्तीला गुरूवर्य योग्य मार्ग दाखवून त्याचे कल्याण करतात असे विचार प.पू.सर्वश्री आशुतोषजी महाराज यांचे कृपापात्र शिष्य स्वामी नरेंद्रानंदजी यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी सदगुरू श्री आशुतोषजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

प.पू.सर्वश्री आशुतोषजी महाराज यांच्या असीम कृपाशिवार्दाने दिव्य ज्योति जाग्रति संस्थान परळीच्या वतीने आज शनिवारी दि.10 डिसेंबर रोजी येथील औदयोगिक वसाहत येथे एक दिवसीय अध्यात्मीक संकिर्तन, सत्संग व प्रवचन सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक सोहळयाचे पुष्प गुंफतांना नवी दिल्ली येथून परळी वैजनाथ येथे आलेले प.पू.सर्वश्री आशुतोषजी महाराज यांचे कृपापात्र शिष्य स्वामी नरेंद्रानंदजी बोलत होते.

आपल्या सत्संग कार्यक्रमातून स्वामी नरेंद्रानंदजी यांनी गुरू कोण असावा ? यापासून शिष्यापर्यंतची संपूर्ण व्याख्या अतिशय सहजतेने व विविध उदाहरणासह स्पष्ट केली. ते म्हणाले की, गुरू सेवा ही सर्वश्रेष्ठ असून ही सेवा श्री हनुमंतासारखी पारदर्शक असावी. श्रीराम व हनुमान, पंढरीचा विठोबा, संत तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, गजानन महाराज यांच्यासह तथागत गौतम बुद्ध यांचे संदर्भ उदाहरण देवून स्वामी नरेंद्रानंदजी पुढे म्हणाले की, गुरू हा बुद्धीचा राजा असून गुरू व शिष्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. जीवन जगत असतांना आपणास अनेक अडचणी येत असतात. परंतू या अडचणीतूनही सदाचाराचा मार्ग दाखविण्याचे काम आपले गुरू नकळतपणे करीत असतात त्याकरीता गुरूवर विश्वास असणे अत्यंत आवश्यक असून अनेकदा गुरू शिष्याची परिक्षा घेतो तेंव्हा शिष्याने त्या प्रसंगाला तन्मयतेने तोंड दिले पाहिजे असे त्या म्हणाल्या.यावेळी त्यांनी संत नामदेव, ज्ञानेश्वर माउली, जनाबाई यांच्या जीवनातील प्रसंग उपस्थितांना सांगितले.

या कार्यक्रमात बोलतांना प.पू.सर्वश्री आशुतोषजी महाराज यांचे कृपापात्र शिष्य स्वामी चिदानंदजी यांनी सांगितले की, सध्याचे जीवन अत्यंत खडतर असून स्पर्धेच्या युगात मानव नाहकपणे भरकटत आहे. अशावेळी गुरू त्यांना योग्य मार्ग दाखवून कल्याणाचा महामंत्र देतो असे  ते म्हणाले. दरम्यान सर्वश्री आशुतोषजी महाराज हे आम्हा सर्वांचे गुरू असून त्यांनी दिलेली शिकवण आमच्या जीवनाचे सार्थक करण्यास उपयुक्त ठरेल असा विश्वास स्वामी चिदानंदजी यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी संत तुकाराम, ज्ञानेश्वर माउली, भगवान श्रीकृष्ण, श्रीराम आदींच्या जीवनातील प्रसंग यावेळी उपस्थितांसमोर मांडले.

या कार्यक्रमाच्या प्रारंभी तेरे द्वारे आए हम, आशुतोष मिटा दो गम यासह अनेक भजने सादर करण्यात आली. टाळ तसेच संगीताच्या स्वरध्वनीवर एक दिवसीय सत्संग कार्यक्रमात भक्त भाविक अक्षरश: मंत्रमुग्ध झाले होते. यावेळी व्यासपीठावर सुश्री निमलता भारतीजी, सुश्री सुषमा भारतीजी, स्वामी निरूपानंदजी आदी उपस्थित होते. आरती व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी परळी शहर व पंचक्रोशीतील भाविकांची अलोट गर्दी या सत्संग सोहळयास उपस्थित राहिली असून शहरात धार्मिकतेचे भरगच्च वातावरण दिसून येत होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार