MB NEWS-विद्यापीठ अनुदान आयोगाचे(यूजीसी) अध्यक्ष जगदेश कुमार यांनी दिली माहिती

 ‘यूजीसी’चा महत्त्वपूर्ण निर्णय; चार वर्षांची पदवी असलेल्या विद्यार्थ्यांना आता थेट ‘पी.एच.डी’ करता येणार



विद्यापीठ अनुदान आयोगाचे(यूजीसी) अध्यक्ष जगदेश कुमार यांनी दिली माहिती

यूजीसीकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. चार वर्षांची पदवीपूर्ण असलेले विद्यार्थ्यांना आता थेट पीएच.डी साठी प्रवेश घेता येणार आहे. अशी माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे(यूजीसी) अध्यक्ष जगदेश कुमार यांनी दिली आहे.



“पीटीआयने यूजीसीच्या हवाल्याने सांगितले की, चार वर्षांचा कार्यक्रम पूर्णत: अंमलात येईपर्यंत तीन वर्षांचे पदवीपूर्व अभ्यासक्रम बंद केले जाणार आहेत.”




पदवीपूर्व शिक्षण तसेच संशोधन आणि पीएचडी अभ्यासक्रम अधिक सक्षम करण्यासाठी यूजीसी मार्गदर्शन तत्वे जाहीर करण्यची योजना आखत आहे.

Click:*पहा:- ■ वारकऱ्यांच्या विरोधानंतर सुषमा अंधारेची पत्रकार परिषद.| नेेमकं काय दिलं स्पष्टीकरण.* #mbnews #subscribe #like #share #comments

पीएचडी प्रवेशासाठी पात्रता निकष बदलले?
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून पीएचडी प्रवेशासाठी असलेले पात्रता निकष बदलण्यात आले आहेत. नव्या नियमानुसार आता पदवीनंतर थेट पीएचडीसाठी प्रवेश घेता येणार आहे. त्यासाठी आता पदव्युत्तर पदवीची अट आवश्यकता राहणार नाही. मात्र, यासाठीही युजीसीकडून काही अटी घालण्यात आल्या आहेत. चार वर्षीय पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना किमान ७५ टक्के गुण किंवा समतुल्य सीजीपीए असल्यास थेट पीएचडीसाठी प्रवेश घेता येणार आहे.

Click &watch:*⭕...... म्हणून रिझर्व्ह बँकेने बीड जिल्ह्यात बंद केलाय १० रुपयांच्या नोटांचा पुरवठा.* #mbnews #subscribe #like #share #comments




ज्यांनी चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमानंतर पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेतला आहे. त्यांनाही पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षाला पीएसडीसाठी प्रवेश मिळणार आहे. मात्र, तीन वर्षीय पदवी अभ्यासक्रमाला असलेल्या विद्यार्थ्यांना ५५ टक्के गुणांसह दोन वर्षीय पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतरच पीएचडीसाठी प्रवेश मिळेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार