MB NEWS-गुजरातमां वन वे छे ! सकाळीच ट्विट करून केले होते भाकित ; अभूतपूर्व यशाबद्दल केले उमेदवारांचे अभिनंदन

 पंकजाताई मुंडेंचे नेतृत्व इथेही चमकले ; गुजरात निवडणूकीत प्रचार केलेले भाजपचे उमेदवार विक्रमी मतांनी विजयी !








गुजरातमां वन वे छे ! सकाळीच ट्विट करून केले होते भाकित ; अभूतपूर्व यशाबद्दल केले उमेदवारांचे अभिनंदन


मुंबई  ।दिनांक ०८।

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचे नेतृत्व गुजरात विधानसभा निवडणुकीतही चमकले आहे, त्यांनी प्रचार केलेल्या मतदारसंघात भाजपचे उमेदवार विक्रमी मताधिक्य घेऊन विजयी झाले आहेत. "गुजरातमां वनवे छे" असं सूचक ट्विट त्यांनी सकाळी केले होते, ते खरे ठरले. निवडणूकीत भाजपला मिळालेल्या  ऐतिहासिक आणि अभूतपूर्व यशाबद्दल त्यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. 


    पंकजाताई मुंडे गुजरातमधील पंचमहल जिल्हयात असलेल्या   कालोल आणि गोधरा मतदारसंघात प्रचारास गेल्या होत्या, तिथे त्यांनी प्रचार बैठका, जाहीर सभा आणि मतदारांच्या काॅर्नर बैठका घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी भाजपला विजयी करण्याचे आवाहन केले होते.कालोल मतदारसंघात भाजपचे फत्तेसिंह चौहान विजयी झाले असून त्यांनी काॅग्रेसच्या प्रभातसिंह चौहान  यांचा एक लाख 15 हजार मतांनी पराभव केला. फत्तेसिंह यांना 1,41,686 मते (75.03 टक्के) तर  प्रतिस्पर्धी इंदिरा काँग्रेसचे उमेदवार प्रभातसिंह चौहान यांना 26007 मतं (13.77 टक्के) मिळाली.

गोधरा  मतदारसंघात भाजपचे सी के राहूल विजयी झाले असून त्यांना 96,223 मते (51.65 टक्के) मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी इंदिरा काँग्रेसचे उमेदवार रश्मिताबेन चौहान यांना 61025 मतं (32.76 टक्के) मिळाली. राहूल यांनी 35 हजार मतांनी काॅग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला. दरम्यान या घवघवीत यशाबद्दल पंकजाताईंनी पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा, भूपेंद्रजी यांचेसह सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार