MB NEWS:राजकीय अध्यात्मिक आघाड्यांचा सामाजिक एकात्मतेला धोका-ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांचा इशारा

 राजकीय अध्यात्मिक आघाड्यांचा सामाजिक एकात्मतेला धोका-ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांचा इशारा



आजरा (प्रतिनिधी) : जो वारकरी संप्रदाय जात, धर्म, पंथ आणि पक्षाच्या बंधनापासून दूर होता त्याला आता राजकीय  अध्यात्मिक आघाड्यांचे ग्रहण लागत आहे. या राजकीय आघाड्यापासून सामाजिक एकात्मतेला धोका निर्माण होईल, असा इशारा ज्येष्ठ पत्रकार आणि प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी दिला. अजरा येथील पहिल्या कीर्तनकार संमेलनाच्या अध्यक्ष पदावरून ते बोलत होते.

आजरा येथील बाजार मैदानात सारथी फाऊंडेशनच्या वतीने कीर्तनकार संमेलनाचे आयोजन केले होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे चोपदार राजाभाऊ महाराज उपस्थित होते. तर उद्घाटक म्हणून देवदत्त परुळेकर यांनी हजेरी लावली. यावेळी बोलताना शामसुंदर महाराज पुढे म्हणाले की, आज वारकरी संप्रदायाला राजकीय ग्रहन लागू पहात आहे. त्यासाठी राजकीय आघाड्या तयार होत आहेत. एका राष्ट्रीय पक्षाची अध्यात्मिक आघाडी चार-दोन वर्षापूर्वीच निर्माण झाली आहे. या आघाडीकडून धार्मिक अस्मितांच्या आडून इतर धर्मियांविषयी द्वेष पसरवून वातावरण गढूळ केले जात आहे. हे कमी होते म्हणूनच की काय आता नव्याने निर्माण झालेल्या एक पक्षानेही आपली अध्यात्मिक आघाडी स्थापन केली आहे. अशा सर्वच पक्षाच्या अध्यात्मिक आघाड्या निर्माण झाल्या तर राजकारणातील गळे कापू स्पर्धा निर्माण होऊन वारकरी संतानी पेरलेला एकात्मतेचा विचार प्रदुषित होईल, असा इशारा त्यांनी दिला. 

वारकरी संतानी महाराष्ट्राच्या मातीची वैचारिक मशातगत केल्यामुळे इथे सुधारणावादी चळवळी रुजल्या. त्यातून देशाला दिशा दाखविणारे शाहू, फुले, आंबेडकर यांच्या सारखे महामानव येथे घडले. त्यांनी  स्री शिक्षणापासून ते अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यापर्य॔तच्या चळवळी येथे उभ्या केल्या. 

संताचा समतावादी विवेकी विचार भक्कम करण्यासाठी गावागावात अशी कीर्तन संमेलन व्हावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त 

         ह. भ. प. राजाभाऊ चोपदार म्हणाले, संतांनी स्वातंत्र्य, समता, बंधूता सांगितले. तीच मूल्ये राज्यघटनेत आली आहेत. संत परंपरेचा प्रभाव महात्मा जोतिबा फुले यांच्यावर आला. तेच विचार शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडली. संताचा विचार भारतासह नेपाळने स्विकारला. संत विचार जगभर पसरत आसताना काही जण संकुचित वागत आहेत. रंगाच्या आधारावर धार्मिक रंग देणे चूकिचे आहे. वारकरी परंपरा कायम ठेवणे गरजेचे आहे. आनंदी जीवन वारकरी संप्रदायाच्या विचारात आहे. वारकरी हा संत विचारांशी एक निष्ठ असल्याने त्यांच्या प्रबोधनाची गरज नाही, तर वारक-यांच्या  नेत्यांच्या प्रबोधनाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.  

            देवदत्त परळेकर म्हणाले, श्रेष्ठ साहित्य केवळ वेदनेतून निर्माण होते. कीर्तन म्हणजे नाम आणि नाम म्हणजे परमेश्वर.प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी म्हणजे किर्तनच आहे, असेही ते म्हणाले.

      स्वागताध्यक्ष सुनिल शिंत्रे म्हणाले, वारकरी परंपरेच्या विचाराचा प्रसार व्हावा, संतांचा आदर्श तरूणांनी घ्यावा. वारकरी संमेलनातून चांगले बी पेरावे यासाठी किर्तनकार संमेलनाचे आयोजन केले आहे.

                  याप्रसंगी व्यासपीठावर गोकूळच्या संचालिका व निमंत्रक अंजना रेडेकर, जेष्ठ साहित्यीक राजाभाऊ शिरगुप्पे, काँ.संपत देसाई, संजय घाटगे उपस्थित होते. मुकुदराव देसाई यांनी पहिल्या सत्राचे आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !