MB NEWS-१२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर येण्यापेक्षा गोपीनाथ गड आपापल्या परिसरात घेऊन जा

 " मौन सर्वार्थ साधनम्....!" : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडे यांचा यावर्षी अनोखा संकल्प





राज्यातील अप्रिय घटनांबद्दल अर्धा तास मौन बाळगा ; विविध समाजोपयोगी उपक्रम राबवा


मुंबई  । दिनांक १०।

दरवर्षी प्रमाणे १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर येण्यापेक्षा यावर्षी आपण वेगळे काही तरी करू या. यावर्षी गोपीनाथ गड तुम्ही आपल्या परिसरात घेऊन जा. गांव असेल, गल्ली असेल, वाॅर्ड असेल तिथपर्यंत गोपीनाथ गड घेऊन जा. जे कोणी मुंडे साहेबांचे कार्यक्रम करू इच्छित असेल अशांनी एकत्र या आणि मुंडे साहेबांची जयंती त्यांना शोभेल अशा समाजोपयोगी कार्यक्रमांनी साजरी करा असं सांगत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी राज्यातील अप्रिय घटनांबद्दल यादिवशी अर्धा तास मौन बाळगण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना एका व्हिडिओ संदेशाद्वारे केलं आहे.


   पंकजाताई मुंडे यांनी म्हटलं आहे की, आपण गेली अनेक वर्षे अनेक कार्यक्रम घेत आहोत, स्वतःचेच विक्रम स्वतःच मोडत आहोत आणि नवीन विक्रम रचण्यासाठी काम करत आहोत. मुंडे साहेबांच जाणं हे आपल्यासाठी जेवढं वेदनादायी आहे तेवढंच त्यांचं स्वप्न जिवंत ठेवणं, आपल्या एकीचं बळ जिवंत ठेवणं, कुठल्याही अन्यायाला सामोरं जाण्याची ताकत ठेवणं हे ही आपल्यासाठी तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून उर्जा, प्रेरणा आणि आशा याचा संगम म्हणून गोपीनाथ गड निर्माण केला आहे.

   या गोपीनाथ गडावर आपण सर्वजण 12 डिसेंबरला उत्साहाने येता. 3 जूनला येता, दसरा मेळाव्याला येता. पण आज मी आपल्या समोर एक वेगळा प्रयोग करण्यासाठी उभी आहे. दरवर्षी आपण गोपीनाथ गडावर येतो, मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त एकत्र येतो, वेगवेगळे भरगच्च कार्यक्रम करतो. पक्ष, विचार याच्या पलिकडे अनेक नेते गोपीनाथ गडावर येऊन मुंडे साहेबांच्या समाधीचं दर्शन घेऊन गेले. आपण त्यांचं मार्गदर्शन ऐकतो, मुंडे साहेबांचे विचार घेऊन तिथून निघतो. यावर्षी माझी आपणांस विनंती आहे, दरवर्षी सारखे गोपीनाथ गडावर येण्यापेक्षा यावर्षी आपण वेगळे काही तरी करू या. यावर्षी गोपीनाथ गड तुम्ही आपल्या परिसरात घेऊन जा. गाव असेल, गल्ली असेल, वाॅर्ड असेल तिथपर्यंत गोपीनाथ गड घेऊन जा. जे कोणी मुंडे साहेबांचा कार्यक्रम करू इच्छित असेल अशांनी एकत्र या आणि मुंडे साहेबांची जयंती त्यांना शोभेल अशी समाजोपयोगी कार्यक्रमांनी साजरी करा.

 

Click: ■ *" मौन सर्वार्थ साधनम्....!" : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडे यांचा यावर्षी अनोखा संकल्प*



*अप्रिय घटनांबद्दल अर्ध्या तासाचं मौन*

--------------

मी 12 डिसेंबरला सकाळी 11 वा. गोपीनाथ गडाचं दर्शन घेणार आहे. 11 ते 11.30 मी तुमच्यासमवेत राज्याच्या कुठल्याही कोपर्‍यात तुम्ही असाल, कोणत्याही भागात असाल, तुमच्यासमवेत अर्ध्या तासाचं मौन बाळगणार आहे. हे मौन कशासाठी तर आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अप्रिय घटनांसाठी..मग हया अप्रिय घटना कुठल्या ? छत्रपती शिवरायांचा अवमान असेल की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा..आपल्या दिल्लीमध्ये केलेल्या एखाद्या भगिनीची निर्घृण हत्या असेल की माझ्या महाराष्ट्रातील अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची आत्महत्या असेल की जातीवादातून एखाद्या वर्गावर झालेला अन्याय असेल या अशा अनेक अप्रिय घटना आहेत, ज्या मुंडे साहेबांना कधीही मान्य नव्हत्या, ज्याच्यासाठी ते आवाज उठवायचे. या अप्रिय घटनांना आपण एक प्रातिनिधिक तिलांजली देण्यासाठी हे मौन धारण करायचे आहे. मौनानंतर दुपारी 12 वा. मी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. अनेक लोकेशनला मी झुम लिंक देणार आहे. त्याठिकाणी जिथे कार्यक्रम होत आहे, तिथे ते लॅपटॉपवर किंवा एखादी स्क्रीन लावली असेल तर त्यावर माझं मार्गदर्शन ते पाहू शकतील. तुम्हाला जोडण्याचा हा एक अनोखा मार्ग आहे. कारण सर्वच जण गडावर येऊ शकणार नाहीत.पण भरपूर लोकं या माध्यमातून माझ्याशी लाईव्ह जोडू शकतील. यावर्षी मुंडे साहेबांच्या जयंतीचा असा अनोखा कार्यक्रम आपण करू. यावर्षी गोपीनाथ गडावर न येता गोपीनाथ गड आपल्या परिसरात न्या, तिथेच आपण मुंडे साहेबांची जयंती साजरी करा अशी विनंती पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.

•••



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार