MB NEWS:युजीसीकडून नेट परीक्षेची तारीख जाहीर

 युजीसीकडून नेट परीक्षेची तारीख जाहीर



 सहायक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षेची (नेट) तारीख युजीसीने (UGC NET JUN 2023) जाहीर केली आहे. ही परीक्षा 13 ते 22 जून 2023 या कालावधीत होणार आहे. यूजीसीचे अध्यक्ष एम. जगदेश कुमार यांनी ही घोषणा केली. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट करत म्हटले आहे की, परीक्षेच्या तारखा आणि इतर माहितीसाठी उमेदवारांनी http://nta.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

(UGC NET JUN 2023) उमेदवार अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जानेवारी 2023 आहे. शेवटच्या तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. या सत्रासाठी अर्ज करणाऱ्या सामान्य, अनारक्षित श्रेणीतील उमेदवारांना 1100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. त्याच वेळी, SC/ST/PWD उमेदवारांना 275 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. परीक्षेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

दरम्यान, नेट परीक्षा 21 फेब्रुवारी ते 10 मार्च 2022 या कालावधीत होणार आहे. UGC NET परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना किमान 40 टक्के आणि राखीव श्रेणीतील उमेदवारांसाठी 35 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?