MB NEWS:ऊसाच्या ट्रॉलीवर कार धडकली ! तिघांचा दुर्दैवी मृत्यू !

 ऊसाच्या ट्रॉलीवर कार धडकली ! तिघांचा दुर्दैवी मृत्यू

 


अंबाजोगाई- रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॉलीला कारची धडक लागून झालेल्या अपघातात रेनापुर येथील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की यामध्ये कारचा पूर्ण चेंदामेंदा झाला.घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.मृतांमध्ये बबन राठोड,नंदू राठोड,राहुल मुंडे यांचा समावेश आहे.

अंबाजोगाई-लातूर महामार्गावर बीड जिल्ह्याच्या हद्दीत असलेल्या दोन पदरी रस्ता लागताच कार चालकाला समोरील ऊसाचा ट्रॅलीला रेडिएम नसल्याने ती न दिसल्यामुळे ट्रॅलीच्या खाली कार घुसल्याचा अंदाज आहे. या घडलेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघात इतका भीषण होता की, कारची समोरील बाजू चेंदामेंदा झाली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून मृतदेह अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

अंबाजोगाई लातूर महामार्ग म्हणजे मृत्यूचा सापळा झाला आहे.विशेषतः सध्या साखर कारखाने सुरू असल्याने दिवसरात्र उसाची वाहतूक सुरू असते,त्यामुळे रहदारीस अडथळा तर होतोच पण रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिफ्लेक्टर नसलेल्या ट्रक,ट्रॅक्टर मुळे मोठ्या प्रमाणावर अपघात देखील होत आहे.

टिप्पण्या

  1. त्यामुळे रेडियम रिफ्लेक्टर ट्रक व ट्रॉली च्या पुढे व पाठीमागे लावावे, जेणेकरून रात्री अपघात होणार नाहीत.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार