MB NEWS:सरपंचाला आता दोन मतांचा अधिकार

 सरपंचाला आता  दोन मतांचा अधिकार




थेट निवडणुकीतून निवडून आलेल्या सरपंचाला आता उपसरपंच निवडीत दोन मतांचा अधिकार प्राप्त झाला असल्याने एकाच गटातील दोन इच्छुकां पैकी आता ते अधिकचे मत कुणाला मिळेल ! तोच उपसरपंचपदी विराजमान होणार आहे.

सरपंच पदाच्या खालोखाल उपसरपंच पद प्रतिष्ठेचे समजले जाते त्यामुळे आता उपसरपंच पदाच्या तडजोडी आणि घोडेबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र आता होणाऱ्या उपसरपंचाच्या निवडी संदर्भात ग्राम विकास विभाग दि. ३० सप्टेंबर२०२२ महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ मधील कलम ३३ नुसार उपसरपंच यांच्या निवडणूकीची प्रक्रीया याची माहिती देण्यात आली आहे.

उपसरपंच पदाच्या निवडणूकीमध्ये पहिल्या फेरीत सरपंच यांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे. उपसरपंच पदाच्या निवडणूकीमध्ये समसमान मते पडल्यास सरपंचाला निर्णायक मत देण्याचा हक्क प्राप्त झाला आहे. उपसरपंचाची निवडणूक ही सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली घेणे व उपसरपंच यांची निवड करणे कायद्याने बंधनकारक आहे. उपसरपंच पदाची निवडणूकीची सभा तहकुब झाल्यास मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम १९६४ च्या नियम १२ मधील तरतुदीनुसार सदरची सभा त्या कारणासाठी दुसऱ्याच दिवशी तात्काळ घेण्यात यावी. उपसरपंचाच्या निवडणूकीकरीता अपरिहार्य कारणास्तव सरपंच अनुपस्थित असतील तर जिल्हाधिकारी यांनी अनुपस्थितीच्या कारणाची खातरजमा करून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ चे कलम ३३ मधील पोट कलम ६ (४) मधील तरतुदीस अनुसरुन तात्काळ पीठासीन अधिकारी यांची नियुक्ती करावी. जेणे करुन विहित कालावधीमध्ये पंचायतीचे गठन होणे शक्य होईल. असे सूचित करण्यात आले आहे त्या संदर्भात कक्ष अधिकारी सुनील माळी यांची स्वाक्षरी आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार