MB NEWS-वैद्यनाथ कॉलेजमध्ये डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना श्रद्धांजली अर्पण

 वैद्यनाथ कॉलेजमध्ये डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना श्रद्धांजली अर्पण

---------------------------------------------



परळी वैजनाथ,

मराठी साहित्यातील प्रसिद्ध समीक्षक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद माजी कुलगुरू अशी सर्वत्र ओळख असणारे महाराष्ट्रातील एक सृजनशील लेखक दिनांक 30 नोव्हेंबर 2022 रोजी अल्पशा आजाराने  पडद्याआड गेले. 


 आज वैद्यनाथ कॉलेजमध्ये या दिग्गज लेखकाला, विचारवंताला चळवळीमध्ये कायम स्वतःला कार्यकर्ता समजणाऱ्या डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.व्ही. मेश्राम सर व  महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद तसेच कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. 


डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या कार्याचा आढावा मराठी विभागातील डॉ.  रा. ज. चाटे यांनी घेतला. डॉ. कोत्तापल्ले यांनी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापर्यंत  केलेला प्रवास, कार्य कर्तुत्वाची साक्षा देणारे आहे.  बीडच्या महाविद्यालयापासून अधिव्याख्याता म्हणून झालेली सुरुवात ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद च्या  कुलगुरू पदापर्यंतचा त्यांचा प्रवास उल्लेखनीय आहे.  नेमस्त साहित्यिक आणि समीक्षक म्हणून त्यांनी निर्माण केलेली ओळख अधिक महत्त्वाची,  गेल्या पाच दशकात साहित्याच्या विविध प्रांतामध्ये आपले स्थान डॉ. कोतापल्ले यांनी निर्माण केलेले होते. कथा, दीर्घकथा, कविता, ललित, कादंबरी आणि समीक्षा अशा साहित्य सर्जनाच्या सगळ्या प्रांतात त्यांनी केलेले सर्जनशील लेखन अनेक व्यक्तिमत्त्वाचे पदर उलगडून दाखविणारे होते.

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले हे महाराष्ट्र शासनाच्या अनेक समित्यांवर सदस्य आणि अध्यक्ष म्हणून काम करणारे व्यक्तिमत्व त्याचबरोबर मराठी साहित्यातील विविध समित्यांवर त्यांनी काम केलेले आहे. 

 फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांवर नितांत श्रद्धा असलेल्या डॉ. कोत्तापल्ले यांनी आयुष्यात साहित्य आणि अध्यापन हेच आपले कार्यक्षेत्र निवडले आणि त्यातच ते रमले ही. आशा या महान कार्य असणाऱ्या डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना वैद्यनाथ कॉलेजमध्ये आदरांजली अर्पण केली.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार