MB NEWS-ग्रुप ग्रामपंचायत लमानतांडा (प.) ग्रा.पं.निवडणुकीत जनसेवा ग्रामविकास पॅनल ला मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद

 ग्रुप ग्रामपंचायत लमानतांडा (प.) ग्रा.पं.निवडणुकीत जनसेवा ग्रामविकास पॅनल ला मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद


गावच्या विकासासाठी एकवेळ संधी द्या-सौ.सुनिता प्रेमदास पवार






परळी वैजनाथ (प्रतिनीधी) :- 

 परळी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत लमाणतांडा निवडणुकीत माजी मंत्री आ.धनंजय मुंडे, वाल्मीकअण्णा कराड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रणित जनसेवा ग्रामविकास पॅनलला मतदरांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत असुन अनेक गावे व तांड्याची मिळुन बनलेल्या या ग्रामपंचायतींमधील ग्रामस्थांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एकवेळ मला संधी देवुन सरपंच पदासाठी निवडुन द्यावे असे आवाहन सरपंच पदाच्या उमेदवार सौ.सुनिता प्रेमदास पवार यांनी केले आहे.


Click:



 ग्रुप ग्रामपंचायत लमाणतांडा(प.) ग्रामपंचायत निवडणुकीत गावातील ग्रामस्थांनी एकत्रित येत सर्वसमावेशक व विकासाची दृष्टी असलेले उमेदवार देवुन जनसेवा ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातुन सरपंच पदासाठी सौ.सुनिता प्रेमदास पवार,प्रभाग क्र.2 मधुन प्रेमलाबाई विठ्ठल राठोड,सौ.वंदना रमेश पवार,विजय प्रभाकर राठोड,प्रभाग क्र.3 मधुन प्रविण भगवान पवार,सौ.शोभा कैलास राठोड,प्रभाग क्र.4 मधुन श्रीमती लक्ष्मीबाई बालासाहेब सानप यांना उमेदवारी दिली असुन हे सर्व उमेदवार गावातील सर्वसामान्य ग्रामस्थांच्या अडीअडचणीत मदतीला धावून येणारे व गावाच्या विकासाचा ध्यास असलेले आहेत.जनसेवा ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांनी प्रचारात सुरुवातीपासुन आघाडी घेतलेली आहे.मतदार या उमेदवारांचे अनेक ठिकाणी स्वागत करत आहेत. प्रचाराच्या शेवटच्या टप्यात सरपंच पदाच्या उमेदवार सौ. सुनिता प्रेमदास पवार यांच्यासह सर्व उमेदवारांना मिळालेला पाठिंबा विजया समीप आणुन ठेवला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !