MB NEWS- "वैद्यनाथ"च्या राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे सांघिक पारितोषिक नगरच्या संघास --दयानंद प्रथम, बलभीम द्वितीय व नगर तृतीय--

 "वैद्यनाथ"च्या राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे सांघिक पारितोषिक नगरच्या संघास




--दयानंद प्रथम, बलभीम द्वितीय व नगर तृतीय--


     परळी वैजनाथ (दि.१०)-

                 दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या ७३ व्या जयंतीनिमित्त जवाहर शिक्षण संस्थेच्या येथील वैद्यनाथ महाविद्यालयात काल (दि.९) राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा  उत्साहात संपन्न झाली. यात सांघिक पारितोषिक अहमदनगर येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स व सायन्स कॉलेजच्या  संघाने जिंकले . स्पर्धेचे वैयक्तिक प्रथम पारितोषिक (₹ ७०००/-व स्मृतिचिन्ह) लातूरच्या दयानंद कला महाविद्यालयाचा विद्यार्थी मेघराज दत्तात्रय शेवाळे याने पटकावले, द्वितीय पारितोषिक (₹ ५०००/- व स्मृतिचिन्ह)बीड येथील बलभीम महाविद्यालयाचा विद्यार्थी रोहन नामदेव चव्हाण याने मिळवले तर तृतीय (₹३००० व स्मृतिचिन्ह) आणि उत्तेजनार्थ पारितोषिक (₹१०००/-) अहमदनगर येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेजचे विद्यार्थी अनुक्रमे प्रवीण सुभाष काजळे व महेश जनार्दन उशीर यांनी प्राप्त केले. प्रमुख पाहुणे कै.ल.दे. महिला महाविद्यालयाचे प्राचार्य एल.एस.मुंडे, संस्थेचे सहसचिव सुरेशचंद्र चौधरी, प्राचार्य डॉ. मेश्राम आदींच्या हस्ते  विजेत्यांना पुरस्कारांचे व पारितोषिकांचे प्रमाण वितरण करण्यात आले.

                     दरम्यान सकाळी या राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे उद्घाटन डॉ. सुरेशचंद्र चौधरी यांच्या हस्ते संपन्न झाले.  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.व्ही.  मेश्राम यांनी अध्यक्षस्थान भूषविले. याप्रसंगी डॉ. चौधरी यांनी वक्त्याच्या अंगी चौफेर विषयज्ञान, भाषासौष्ठव, अपूर्व धारिष्ट, वाक्चातुर्य, आत्मविश्वास, जिंकण्याची जिद्द, सहृदयता यांबरोबरच नैतिकतेचे अधिष्ठान असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.  समारोप सत्रात दुपारी प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. एल. एस.मुंडे  यांनी विद्यार्थ्यांना सर्व क्षेत्रातील प्रगती साधण्याचे वक्तृत्व हेच माध्यम प्रभावी असल्याचे सांगून विजेत्यांचे अभिनंदन केले. प्राचार्य डॉ. मेश्राम यांनी विद्यार्थ्यांकडून आदर्श मानव समाज निर्मितीसाठी प्रभावशाली वक्तृत्व कौशल्य संपादन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.  

           स्पर्धेचे परीक्षक म्हणूनच ॲड. प्रवीण सावरगावकर (लातूर), प्रा. डॉ. ममता राठी (अंबाजोगाई) प्रा. डॉ.नयनकुमार आचार्य (परळी) यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  प्रभारी प्रा. डॉ. एम.जी. लांडगे यांनी केले . परीक्षकांचा  परिचय प्रा. वाय. डी. रेड्डी डी. त्यांनी करून दिला.सूत्रसंचालन प्रा.डॉ. अर्चना चव्हाण व प्रा. दिलीप गायकवाड त्यांनी केले. तर आभार प्रा. डॉ. आर. जे. चाटे यांनी मानले. कार्यक्रमास उपप्राचार्य एच.डी. मुंडे, पर्यवेक्षिका प्रा. मंगला पेकमवार व इतर उपस्थित होते. स्पर्धेच्या सफलतेसाठी प्रा. उमाकांत कुरे, प्रा. अभय तिवार, प्रा. डी. आर. मुंडे व इतरांनी  परिश्रम घेतले.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !