परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर; विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार



------

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 19 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मुंबईत येत आहे. नरेंद्र मोदी मुंबईतील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार असून  मेट्रो 2 A आणि मेट्रो 7 चे लोकार्पण त्यांच्या हस्ते होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


राज्यातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मोदींच्या स्वागतासाठी मुंबई आणि प्रदेश भाजपने जोरदार तयारी केली आहे. या संदर्भात आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर महत्त्वपुर्ण बैठक होणार आहे. भाजपने मिशन मुंबई महापालिका निवडणूक सुरू केलं आहे. मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या दौऱ्याला मोठे महत्त्व आहे.


महाविकास आघाडी स्थापन होऊन आता जवळपास अडीच वर्ष होत आली आहेत असं असताना भाजपनं मिशन 2024 च्या नावाखाली मोर्चेबांधणी सुरू केली. आगामी काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपने कंबर कसली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने मोदींचा दौरा अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. अनेक विकासकामांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. बीकेसीच्या मैदानावर भाजप मोठा कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून तयारी सुरू आहे. अद्याप यावर अंतिम निर्णय बाकी आहे.


दुसरीकडे ठाण्यामध्ये देखील पंतप्रधान जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात कॅन्सर हॉस्पिटलच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान येण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष उपस्थित नाही राहिले तर ऑनलाईन तरी कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. 2024 च्या लोकसभ निवडणुकीला घेऊन भाजप अत्यंत गांभीर्यपूर्वक नियोजन करत असून प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस व इतर प्रादेशिक पक्ष यांनी सध्या तरी लोकसभा निवडणुकीवर काम सुरू केल्याचे तूर्तास दिसत नाही. या तयारीने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला किती यश मिळेल हे सध्या तरी सांगता येणार नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!